तरुणांनी झोमॅटोवरून मागवलं चिकन, जेवनातच आढळली पाल, नंतर तरुणाला झाल्या उल्ट्या अन्...

viral news : तरुणांनी झोमॅटोवरून जेवण मागितलं, नंतर जेवण करताना त्यात मेलेली पाल आढळली आणि तरुणाला उलट्या होऊ लागल्या होत्या.

crime news

crime news

मुंबई तक

11 Dec 2025 (अपडेटेड: 11 Dec 2025, 06:20 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जेवणाच्या ताटात पडली पाल...

point

तरुण रुग्णालयात दाखल

point

नेमकं घडलं काय?

viral news : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील शास्त्रीनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विजय नावाच्या तरुणाने नीरज नावाच्या मित्राला घरी जेवणासाठी बोलावले होते. नीरज गाजियाबादच्या एका खाजगी कंपनीत काम करत होता. रात्रीच दोघांना प्रचंड भूक लागली होती. तेव्हा विजयने झोमॅटोवरून कडई चिकनची मागणी केली होती. ही ऑर्डर रात्री 9:00 वाजताच्या सुमारास डिलिव्हर करण्यात आली होती.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'चल सीक्रेट गेम..' घर मालकाच्या 13 वर्षाच्या मुलाचे भाडेकरूच्या 5 वर्षीय मुलीसोबत नको ते चाळे, वर्षभर बलात्कार अन्..

जेवणात अढळला मृत पाल 

जेवण करण्यापूर्वी विजय हात धुण्यासाठी बाहेर गेला असता, नीरजने जेवण करण्यास सुरुवात केली होती. नीरजने दिलेल्या माहितीनुसार, त्याने अर्ध जेवण तसंच सोडलं होतं, तेव्हा एका ताटात त्याला मृत पाल दिसून आली होती. हे बघून त्यांना उल्टी आली आणि त्यांची तब्येत देखील बिघडली.

नीरज रुग्णालयात दाखल 

या घटनेनंतर विजयने 112 वर संपर्क केला आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नीरजला मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आलं होतं. नीरज हा तब्बल  24 तास डॉक्टरांच्या निगरानीखाली होता. 9 डिसेंबर रोजी रात्री तिला सुट्टी देण्यात आली होती.

हे ही वाचा : दारूच्या नशेत बोगस डॉक्टर, You Tube वर व्हिडिओ बघून केलं ऑपरेशन, नंतर रुग्णाचा दुर्दैवी अंत

पीडित नीरजचे म्हणणे होतं की, हॉटेल मालकाने आपली चूक मान्य केली. याच घटनेचा व्हिडिओ झोमॅटो ऑर्डर बिलासह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ आणि सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या बिलावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अशातच, पीडितेनं सांगितलं की, तो याच प्रकरणाचा पुढे पाठपुरावा करणार नाही. 

    follow whatsapp