नव्या मोबाईल फोनसाठी पत्नीने थेट जीवच दिला... फाशीला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह!

पतीने नवा मोबाईल घेण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून एक महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

नव्या मोबाईल फोनसाठी पत्नीने थेट जीवच दिला...

नव्या मोबाईल फोनसाठी पत्नीने थेट जीवच दिला...

मुंबई तक

• 08:00 AM • 16 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

नव्या मोबाईल फोनसाठी पत्नीने थेट जीवच दिला...

point

फाशीला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह!

Crime News: पतीने नवा मोबाईल घेण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून एक महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूर जिल्ह्यात ही घटना घडली असून शुक्रवारी (13 फेब्रुवारी) 27 वर्षीय महिलेने तिच्या घरात स्वत:चं आयुष्य संपवलं. राधिका असं पीडित महिलेचं नाव असून ती मीरापूर पोलीस स्टेशन हद्दीतील खेडी सराय गावाची रहिवासी असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

नव्या मोबाईलसाठी पत्नीचा पतीकडे हट्ट... 

संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती आशीष शर्मा हा त्याच्या कामानिमित्त ओडिशा येथे राहत होता. राधिका गेल्या काही काळापासून तिच्या पतीकडे एक नवा मोबाईल फोन घेऊन देण्यासाठी हट्ट करत होती आणि त्यासाठी तिने पतीकडे 10 हजार रुपये मागितले होते. मात्र, पतीने तिला केवळ 2 हजार रुपये दिले. 

हे ही वाचा: होणाऱ्या नवऱ्याच्या फोनमध्ये दुसऱ्या मुलीचा फोटो पाहिला... संतापलेल्या तरुणीच्या कृत्यामुळे होत्याचं नव्हतं झालं

पतीने कमी पैसे दिल्याने पत्नीची आत्महत्या... 

पतीने नवा मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी कमी पैसे दिल्याने राधिका नाराज झाली आणि त्यामुळे तिने शुक्रवारी घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. वृत्तानुसार, राधिकाला एक तीन वर्षांचा लहान मुलगा मुलगा असून आता त्याच्यावरून आईचं छत्र हरपलं. या किरकोळ कारणावरून घडलेल्या भयानक घटनेमुळे पूर्ण गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. 

हे ही वाचा: रक्ताच्या थारोळ्यात व्हॅलेंटाईन्स डे! कारमध्ये सापडला प्रेमीयुगुलाचा मृतदेह; कोणी घातल्या गोळ्या?

प्रकरणाची माहिती मिळताच मीरापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडित महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण आत्महत्या असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. पोलीस आता या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत असून पोस्टमॉर्टची रिपोर्ट्सची प्रतिक्षा आहे. 

    follow whatsapp