Shocking Murder Case Viral : एका खळबळजनक घटनेमुळं उत्तरप्रदेशमधील नोएडा हादरला आहे. 38 वर्षीय विवाहित व्यक्ती मुकीमने 37 वर्षांच्या शबनमचा गळा चिरून हत्या केली. अनैतिक संबंधांचा पर्दाफाश झाल्याने त्याच्या पत्नीला आणि मुलांना याबाबत कळलं होतं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हत्येनंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण..
ही धक्कादायक घटना शुक्रवारी 5 जुलै रोजी निर्माण विहार कॉलनीत घडली. शबनमच्या हत्येनंतर तिच्या मुलाने पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दोन टीम गठित केल्या. त्यानंतर शनिवारी चौगानपूर राऊंड अबाऊटजवळ चेकिंग दरम्यान आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. डीसीपी शक्ती मोहन अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना पाहून मुकीमने पळ काढला. मोटारसायकल सोडून त्याने पोलिसांवर फायरिंग केली. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात मुकीमच्या पायाला एक गोळी लागली आणि त्याला पकडलं.
हे ही वाचा >> मुलगी आणि आईचे होते अनैतिक संबंध, शारीरिक संबंधासाठी चटावलेल्या दोघींनी केलं भयंकर कृत्य
हत्या का करण्यात आली?
पोलीस तपासात मुकीमने कबूल केलं की, त्याचं शबनमसोबत खूप दिवसांपासून अफेअर सुरु होतं. पण जेव्हा त्याची पत्नी आणि मुलांना याबाबत समजलं. त्यानंतर त्याने शबमनमच्या हत्येचा कट रचला. हत्येच्या दिवशी शबनमला भेटण्याच्या बहाण्याने गेला होता. त्यानंतर त्याने धारदार चाकून तिचा गळा कापून हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून एक चाकू, देसी कट्टा, जिवंत काडतूस आणि मोटारसायकल जप्त केली.
त्या ठिकाणीही घडली होती भयंकर घटना
उत्तरप्रदेशच्या मथुरात एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली होती. येथील एका पतीला त्याच्या पत्नीच्या अफेअरबाबत समजलं होतं. पण तरीही त्याने मोठ्या मनाने पत्नीला माफ केलं. पण पत्नीने पुन्हा धोका देऊ नये, म्हणून तिच्यावर थोडेफार निर्बंध लादले. म्हणजेच पती पत्नीवर नजर ठेऊ लागला. पतीला कदाचित माहित नव्हतं की, असं करणं त्याला महागात पडू शकतं.
हे ही वाचा >> Pune: दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, नंतर दुकानात तरूणावर कोयत्याने सपासप वार, धक्कादायक कारण आलं समोर
ही संपाजनक घटना कोसीकला गावात घडली. पोलिसांनी म्हटलं की, ऐंच गावातील रहिवासी 27 वर्षीय गोविंद घरातून दारूच्या नशेत बाहेर पडला होता. याची माहिती गोविंदची पत्नी कविताने तिचा प्रियकर गुंजार उर्फ गुलजार भोलेला दिली. पुढे भेटायचं असेल तर गोविंदची हत्या कर, असं कविताने गुंजारला सांगितलं. त्यानंतर गुंजारने गोविंदच्या मानेवर वार केले आणि त्याचा मृतदेह सुनसान जागेवर फेकला होता.
ADVERTISEMENT
