3 पतींनी सोडलं..बाळ झाल्यावर प्रियकरानेही नातं संपवलं! मुंबईतील महिलेनं 6 महिन्यांच्या बाळाची केली हत्या

Mumbai Shocking Crime News : मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका महिलेनं तिच्या 6 महिन्यांच्या बाळाची हत्या केलीय. त्यानंतर महिलेनं पोलिसांना हत्येचं कारण सांगितलं, तेव्हा त्यांनाही हादराच बसला.

महिला एसआय पोलिसांकडून अटक

Mumbai Crime News

मुंबई तक

• 02:21 PM • 02 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत घडली सर्वात धक्कादायक घटना

point

महिलेनं तिच्या 6 महिन्यांच्या बाळाची केली हत्या

point

हत्येमागंच कारण ऐकून पोलिसही हादरले

Mumbai Shocking Crime News : मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका महिलेनं तिच्या 6 महिन्यांच्या बाळाची हत्या केलीय. त्यानंतर महिलेनं पोलिसांना हत्येचं कारण सांगितलं, तेव्हा त्यांनाही हादराच बसला. पोलिसांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, ही धक्कादायक घटना चेंबूर येथील तिलक नगर परिसरात घडली.पोलिसांनी सांगितलं की, येथील एका 43 वर्षीय महिलेनं तिच्या 6 महिन्यांच्या बाळाचा उशीने तोंड ताबून हत्या केली. बाळ पाळण्यात झोपेत असताना महिलेनं हे संतापजनक कृत्य केलं. बाळाची हत्या केल्यानंतर आरोपी महिलेनं दुसऱ्या महिलेवरही हल्ला केला.

कंट्रोल रुमला आला फोन

पोलिसांच्या माहितीनुसार, कंट्रोल रुमला एक कॉल आला होता. एक महिला दुसऱ्या महिलेवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती फोनवर देण्यात आली होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. तिथे जाऊन पोलिसांनी हल्ला करणाऱ्या महिलेला अटक केली. त्यावेळी उघडकीस आलं की, महिलेनं तिच्या बाळाचीही हत्या केलीय. त्यानंतर दुसऱ्या महिलेला मारण्याचा प्रयत्न केला. ती महिला घरी मोलकरणीचं काम करत होती. त्यानंतर आरोपी महिला स्वत: आत्महत्या करणार होती.

हे ही वाचा >> पक्षांतरावरुन सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना जबर दणका!

आरोपीने म्हटलं की, मी माझ्या परिस्थितीमुळे खूप नैराश्यात होती. मी बेरोजगार होती. माझ्या तीन पतींनी मला सोडलं होतं. त्यानंतर एक प्रियकर भेटला. त्याच्यासोबत प्रेग्नंट झाल्यावर त्याने मला सोडलं. त्यानंतर मला समजलं की मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे आणि मला एक मुलगाही आहे. याचमुळे मी नैराश्यात होती. म्हणून मी मुलाची हत्या केली.

महिलेनं सांगितली आपबीती

महिलेला शुक्रवारी जेव्हा न्यायालयात हजर केलं. तेव्हा तिने म्हटलं, मी एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. यामुळे माझा मृत्यू होऊ शकतो. माझं तीनवेळा लग्न झालं आहे.पण सर्वांनी मला सोडलं. तसच माझ्या प्रियकरानेही मला बाळ झाल्यानंतर सोडून दिलं. मुलाला जन्म दिल्यानंतर मला आणि बाळाला आजार असल्याचं समजलं. आर्थिक परिस्थितीही बिकट होती. या सर्व गोष्टींचा वैगात आल्याने मी हे पाऊल उचललं.

हे ही वाचा >> सोनं घ्या सोनं! ऑगस्ट महिना सुरु होताच ग्राहकांची सुरु झाली दिवाळी..आजही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

    follow whatsapp