'तू अश्लील व्हिडिओ बघतेस..' महिला घाबरली अन् गेम झाला!

"तुम्ही गुगलवर अश्लील व्हिडिओ पाहिले असून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तुम्हाला लवकरच अटक केली जाईल," अशी धमकी या भामट्याने महिलेला दिली. अचानक आलेल्या या फोनमुळे आणि अटकेच्या भीतीने महिला प्रचंड घाबरली.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 07:11 AM • 10 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

'तु अश्लील व्हिडिओ बघतेस..'

point

महिला घाबरली अन् गेम झाला!

Crime News : छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे 'डिजिटल अरेस्ट' आणि भीती दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मार्च 2026 मध्ये एका महिलेला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने अत्यंत रुबाबदार आवाजात आपण 'क्राईम ब्रँच'चे अधिकारी असल्याचे सांगितले. "तुम्ही गुगलवर अश्लील व्हिडिओ पाहिले असून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तुम्हाला लवकरच अटक केली जाईल," अशी धमकी या भामट्याने महिलेला दिली. अचानक आलेल्या या फोनमुळे आणि अटकेच्या भीतीने महिला प्रचंड घाबरली.

हे वाचलं का?

घाबरलेल्या महिलेने काय केले?

या भीतीचा गैरफायदा घेत भामट्यांनी महिलेवर मानसिक दबाव टाकण्यास सुरुवात केली. कायदेशीर कारवाई आणि अटक टाळायची असेल, तर पैसे द्यावे लागतील असे सांगून त्यांनी महिलेला घाईघाईने पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. घाबरलेल्या महिलेने समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैशांचे व्यवहार केले. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने तिच्या बँक खात्यातून एकूण 4.50 लाख रुपये उकळण्यात आले. काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तातडीने गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

हे ही वाचा : स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने तरुणीला घरात बोलावले, तोंडात कापडाचा बोळा कोंबून...

पोलीस तपासात काय आढळले?

महिलेच्या तक्रारीनंतर गांधीनगर पोलीस आणि सायबर सेलने संयुक्त तपास सुरू केला. पोलिसांनी बँकेचे व्यवहार, डिजिटल फूटप्रिंट्स आणि बँक खात्यांची कसून चौकशी केली असता, फसवणुकीची रक्कम अनेक वेगवेगळ्या खात्यांमध्ये फिरवण्यात आल्याचे समोर आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचे लोकेशन ट्रेस केले. तपासाची ही चक्रे थेट शेजारील राज्य मध्य प्रदेशातील टीकमगढपर्यंत पोहोचली. तिथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून काशीराम अहिरवार, पन्नालाल यादव आणि अभिलाषा अहिरवार या तिघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

हे ही वाचा : जनगणनेसाठी गेलेल्या शिक्षिकेला मुख्याध्यापकानंच..., नेमकं काय घडलं?

आंतरराज्यीय गँग

हा आंतरराज्याचीय गँगचा एक भाग असून, हे ठग लोकांना फोन करून स्वतःला क्राईम ब्रँच किंवा इतर तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे सांगायचे. त्यानंतर अटकेची भीती दाखवून लोकांना विचार करण्याची संधी न देता पैसे उकळायचे, असे तपासात उघड झाले आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही शासकीय किंवा तपास यंत्रणा फोनवरून अशा प्रकारे धमकी देऊन पैशांची मागणी करत नाही; असा फोन आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून यामागे आणखी मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत.