Devendra Fadnavis : ''धोत्रेंच्या पाठीशी महायुती, पवार साहेब सुद्धा...'', फडणवीस बोलून चुकले अन्...

मुंबई तक

03 Apr 2024 (अपडेटेड: 03 Apr 2024, 05:37 PM)

Akola Loksabha Election 2024, Anup Dhotre : भाजप निवडून आली तर संविधान बदलतील असा आरोप विरोधकांकडून होतो आहे. या आरोपावर बोलताना फडणवीस म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे संविधान बनवले आहे की कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी संविधानाला कुणी हात लावू शकत नाही.

akola lok sabha election 2024 devendra fadnavis sanjay dhotre son anup dhotre nomination form filed mahayuti candidate Prakash ambedkar

आता ही निवडणूक आपल्या हाती घ्या आणि अनुप धोत्रे यांना दिल्लीत पाठवा

follow google news

Akola Loksabha Election 2024, Anup Dhotre : धनंजय साबळे,  अकोला :  अकोला लोकसभा मतदार संघात आज संजय धोत्रे यांचे पुत्र आणि भाजप उमेदवार अनूप धोत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी धोत्रे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'महायुतीचे सर्व नेते अनुपच्या (Anup Dhotre) पाठीशी आहेत, पवार साहेब सुद्धा...' असं ते म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पुढे भाषणात दुरूस्ती केली. (akola lok sabha election 2024 devendra fadnavis sanjay dhotre son anup dhotre nomination form filed mahayuti candidate Prakash ambedkar)  

हे वाचलं का?

अकोल्यात अनुप धोत्रेंनी एका सभेचे आयोजन केले होते. या सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''आम्ही सगळे लोकं अनुपच्या पाठीशी आहोत. महायुतीचे सर्व नेते अनुपच्या पाठीशी आहोत, शिंदे साहेब असतील, पवार साहेब असतील...,'' फडणवीस पवार साहेब बोलताच कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. 

हे ही वाचा : ठाकरेंना कल्याणमध्ये 'ही' चूक महागात पडणार का?

त्यानंतर फडणवीसांनी आपली चुक दुरुस्त केली. पवार साहेब म्हणजे अजित दादा... कन्फ्युजन नाही अजित दादा हे सगळे अनुपच्या पाठीशी आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आता ही निवडणूक आपल्या हाती घ्या आणि अनुप धोत्रे यांना दिल्लीत पाठवा, असे आवाहन देखील फडणवीस यांनी मतदारांना केले. 

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसवरही टीका केली. भाजप निवडून आली तर संविधान बदलतील असा आरोप विरोधकांकडून होतो आहे. या आरोपावर बोलताना फडणवीस म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे संविधान बनवले आहे की  कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी संविधानाला कुणी हात लावू  शकत नाही. 

हे ही वाचा : Hatkanangle Lok Sabha Election : राजू शेट्टींसोबत उद्धव ठाकरेंचं का फिस्कटलं?

तसेच नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये संविधान सुरक्षित आहे. संविधानाची हत्या तुम्ही (काँग्रेस) 1975 साली केली होती. त्यावेळी स्व. इंदिराजींनी संविधान बदलून  2 लाख विरोधी पक्षातले नेते अटल बिहारी वाजपे, अडवाणीसहित जॉर्ज फर्नांडीस सह सगळ्यांना जेलमध्ये टाकलं होतं. म्हणून या नाटकबाजांच्या नाटकांना कुणाचाही प्रतिसाद मिळत नाही. या नाटकबाजांची नाटक आपण खूप वर्ष सहन केली,असी टीका देवेद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली आहे. 

    follow whatsapp