BJP Candidate List : भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांनी मिळाली संधी?

प्रशांत गोमाणे

24 Mar 2024 (अपडेटेड: 24 Mar 2024, 10:31 PM)

BJP announce second candidate list : महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे. या यादीत सोलापूरातून राम सातपूते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा-गोंदीयातून सुनील मेढे आणि गडचिरोली चिमूर मतरदार संघातून अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

bjp announce second candidate list of maharashtra lok sabha election 2024 ram satpute sunil medhe ashok nete

भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

follow google news

BJP announce second candidate list :भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे. या यादीत सोलापूरातून राम सातपूते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा-गोंदीयातून सुनील मेंढे आणि गडचिरोली चिमूर मतरदार संघातून अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (bjp announce second candidate list of maharashtra lok sabha election 2024 ram satpute sunil medhe ashok nete)

हे वाचलं का?

 

भाजपने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापूरातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सोलापुरात विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे तिकीट कापले गेले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राम सातपूते लोकसभा लढणार आहेत. राम सातपूते यांनी काही दिवसांपूर्वी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती.या भेटीनंतर सातपूतेंच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या.  

हे ही वाचा : Raju Parwe : काँग्रेसला विदर्भात झटका, शिंदेंनी फोडला आमदार

राम सातपुते यांच्यासह भंडारा-गोंदीयातून सुनील मेंढे आणि गडचिरोली चिमूर मतरदार संघातून अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे भाजपने दुसऱ्या यादीत तीन उमेदवार जाहीर केले आहेत. 

 

दरम्यान याआधी भाजपने महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी, पियुष गोयल, पंकजा मुंडे यांच्यासह 20  उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात 6 नवे चेहरे आहेत, तर 14 जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. 

भाजपची पहिली यादी

1. नंदूरबार (ST राखीव) - हिना गावित 
2. धुळे - सुभाष भामरे 
3. जळगाव - स्मिता वाघ
4. रावेर - रक्षा खडसे 
5. अकोला - अनुप धोत्रे
6. वर्धा - रामदास तडस 
7. नागपूर - नितीन गडकरी
8. चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
9. नांदेड - प्रतापराव पाटील-चिखलीकर
10. जालना - रावसाहेब दानवे 
11. दिंडोरी (ST राखीव) - भारती पवार 
12. भिवंडी - कपिल पाटील
13. मुंबई उत्तर - पियूष गोयल
14. मुंबई उत्तर-पूर्व (ईशान्य मुंबई) - मिहीर कोटेचा 
15. पुणे - मुरलीधर मोहोळ
16. अहमदनगर - सुजय विखे-पाटील 
17. बीड- पंकजा मुंडे
18. लातूर (SC राखीव) - सुधाकर श्रृंगारे
19. माढा - रणजीतसिंह नाईक-निंबाळकर
20. सांगली - संजयकाका पाटील

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : राणांना निवडणूक जाणार जड, बच्चू कडू उतरवणार 'भिडू'!

भाजपची दुसरी यादी

सोलापूर- राम सातपुते
भंडारा-गोंदिया-सुनील मेंढे
गडचिरोली चिमूर- अशोक नेते 

दरम्यान भाजपकडून याआधी 20 उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता 3 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत भाजपकडून 48 पैकी 23 उमेदवार ठरले आहे. त्यामुळे आता उरलेल्या 25 जागांमधून अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या वाट्याला किती जागा येणार? भाजप  23 जागांच्या आकडा ओलांडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

    follow whatsapp