Devendra : फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं, ''25 वर्षात एक प्रोजेक्ट...''

प्रशांत गोमाणे

23 Mar 2024 (अपडेटेड: 23 Mar 2024, 06:02 PM)

Devendra Fadnavis Criticize Uddhav Thackeray : आमचं 80 टक्के जागावाटप पूर्ण झालं आहे आणि फक्त 20 टक्के बाकी आहे. त्यामुळे जागावाटप लवकर करू. आमच्याकडे आता खूप जास्त जागावाटप घोषित होणे बाकी राहीले नाही. त्यामुळे आता आमच्यात अंतिम तीन पक्षाचा जागावाटप होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

devendra fadnavis criticize udhhav thackeray mahayuti loksabha seat sharing maharashtra politics

आमचं 80 टक्के जागावाटप पूर्ण झालं आहे आणि फक्त 20 टक्के बाकी आहे.

follow google news

Devendra Fadnavis Criticize Uddhav Thackeray :  ''उद्धव ठाकरेंना मी टोमणेबहाद्दर ही उपमा दिली आहे. मी दिलेली उपमा किती सार्थ ठरवायची हा त्यांचा प्रयत्न आहे.उद्धव ठाकरेंनी एक वाक्य विकासावर बोलून दाखवावं. 25 वर्षात हे सांगू शकतील असा एक प्रोजेक्ट नाही आहे. म्हणून हे विकासावर बोलूच शकत नाही. त्यामुळे अदवा तदवा बोलणे, हेडलाईन बनवणे, मनोरंजन करणे या व्यतिरीक्त त्यांच्या पदरी काहीच नाही आहे,अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) डिवचलं आहे. (devendra fadnavis criticize udhhav thackeray mahayuti loksabha seat sharing maharashtra politics) 

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस दिल्लीत प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी फडणवीसांनी महायुतीच्या जागावाटपावर भाष्य केले. आमचं 80 टक्के जागावाटप पूर्ण झालं आहे आणि फक्त 20 टक्के बाकी आहे. त्यामुळे जागावाटप लवकर करू. आमच्याकडे आता खूप जास्त जागावाटप घोषित होणे बाकी राहीले नाही. त्यामुळे आता आमच्यात अंतिम तीन पक्षाचा जागावाटप होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

हे ही वाचा : आंबेडकरांची मोठी घोषणा; 'या' उमेदवाराला पाठिंबा जाहीर!

साताऱ्यातून उदयनराजेंच्या उमेदवारीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, उदयनराजेंची भेट गृहमंत्र्यांशी आज होईल आणि ते आपलं मत मांडतील. त्यानंतर अंतिम निर्णय गृहमंत्री अमित शाह घेतील. मला तडीपार करण्याचा डाव गृहमंत्र्यांचा असल्याचा आरोप जरांगेंनी केला होता. या आरोपावर बोलताना, फडणवीस म्हणाले की, आमचे खुप हिंतचिंतक आहेत, ते हितचिंतक जाऊन जरांगे पाटलांना जाऊन सांगतात. त्याच्यावर ते बोलत असतात. असं कुणी कुणाला तडीपार करतं का? तडीपार करण्यासारखं त्याच्यावर काही केसेस आहेत का? असं काही नाही आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत. 

मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या आंदोलनाच्या केसेस मागे घेणार आहोत. पण ज्या ठिकणी जाळपोळ, तोडफोड झाली आहे, पोलिसांवर हल्ले झाले आहेत, जिकडे लोक उघडपणे हल्ला करताना दिसतायत अशा केसेस परत घेणे शक्य नाही. साधारण 492 केसेस आहेत. यामधील 172 केसेस परत घेण्याची शिफारस देखील झालेली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : शरद पवारांची PM मोदींवर जोरदार टीका, ''संविधानावर हल्ला...''

 उद्धव ठाकरेंना मी टोमणेबहाद्दर ही उपमा दिली आहे. मी दिलेली उपमा किती सार्थ ठरवायची हा त्यांचा प्रयत्न आहे. माझं एकच म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंनी एक वाक्य विकासावर बोलावं. 25 वर्षात हे सांगू शकतील असा एक प्रोजेक्ट नाही आहे, मी माझ्या काळात सुरु झालेले 10 आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकतो. हे काहीच करू शकले नाहीत, म्हणून हे विकासावर बोलूच शकत नाही. त्यांना अदवा तदवा बोलणे आणि हेडलाईन बनवणे, मनोरंजन करणे याच्या व्यतिरीक्त त्यांच्या पदरी काय आहे. काहीच नाही आहे. 

    follow whatsapp