Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 उमेदवार ठरले?, ही पाहा संपूर्ण यादी

मुंबई तक

23 Mar 2024 (अपडेटेड: 23 Mar 2024, 08:36 PM)

Shiv Sena UBT Candidate 1st list: लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर कोणता पक्ष नेमकं कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण त्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेची एक यादीच आता समोर आली आहे.

उद्धव ठाकरेंनी 20 जागांवर उमेदवार ठरवले

उद्धव ठाकरेंनी 20 जागांवर उमेदवार ठरवले

follow google news

Shiv Sena UBT Candidate list: मुंबई: शिवसेना (UBT)पक्ष हा लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा लढविणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. मात्र, असं असलं तरीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, आता निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच इच्छुकांची धाकधूक ही वाढली आहे. पण आता शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 20 उमेदवारांची नावं पक्की झाली आहेत. (lok sabha election 2024 20 candidates of uddhav thackeray shiv sena selected see the complete list)

हे वाचलं का?

लोकमत वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाने 20 जणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे. आता हे 20 उमेदवार नेमके कोण याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युतीत असताना 23 जागा लढवत होते. मात्र, आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांच्या जागा काहीशा कमी होण्याची शक्यता आहे. पण तरीही महाविकास आघाडीमध्ये त्यांच्याच जागा जास्त असणार आहे. त्यापैकी 20 जागांवर त्यांचे उमेदवार देखील निश्चित झाले आहेत. 

हे ही वाचा>> Devendra : फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं, ''25 वर्षात एक प्रोजेक्ट...''

महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत केवळ काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे आणि त्यातही केवळ सातच उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत. पण त्यापैकी 2 जागा या आधी शिवसेनेने लढवल्या होत्या. कोल्हापूर आणि अमरावती या दोन्ही जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत. अशावेळी शिवसेनेकडे ज्या जागा आता उरल्या आहेत. तेथे कोण उमेदवार असणार हेच आपण पाहणार आहोत. 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून आधी उद्धव ठाकरेंकडे असलेलं मुख्यमंत्री पद स्वत:कडे घेतलं आणि त्यानंतर त्यांचा शिवसेना हा पक्षच ताब्यात घेतला. तेव्हापासून ठाकरे आणि शिंदे यांच्यात उभा दावा आहे. अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र ज्या कल्याण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तिथे ठाकरेही उमेदवार देणार आहेत. ज्यासाठी त्यांनी स्वर्गीय शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या सख्ख्या पुतण्यालाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचं समजतं आहे. त्यामुळे कल्याणच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे ही वाचा>> आंबेडकरांची मोठी घोषणा; 'या' उमेदवाराला पाठिंबा जाहीर!

याशिवाय इतरही अनेक उमेदवार ठाकरेंनी निश्चित केले आहेत. पण सांगलीच्या चंद्रहार पाटील यांची उद्धव ठाकरेंनी थेट जाहीर सभेतूनच उमेदवारीची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त इतर कोणकोणत्या उमेदवारांना ठाकरे तिकीट देऊ शकतात याची यादीच आता समोर आली आहे ते आपण पाहूयात

उद्धव ठाकरे 'यांना' देणार तिकीट?

  1. कल्याण - केदार दिघे
  2. ठाणे - राजन विचारे
  3. मुंबई उ. पूर्व - संजय दीना पाटील
  4. मुंबई द. मध्य - अनिल देसाई
  5. मुंबई दक्षिण - अरविंद सावंत
  6. मुंबई उत्तर - तेजस्वी घोसाळकर
  7. मुंबई उ. पश्चिम - अमोल कीर्तिकर
  8. रायगड - अनंत गीते
  9. बुलढाणा - नरेंद्र खेडकर 
  10. यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
  11. शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे
  12. नाशिक - विजय करंजकर
  13. हिंगोली - नागेश आष्टीकर
  14. पालघर - भारती कामडी
  15. परभणी - संजय जाधव
  16. धाराशिव - ओमराजे निंबाळकर
  17. सांगली - चंद्रहार पाटील
  18. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत
  19. मावळ - संजोग वाघेरे
  20. छ. संभाजीनगर - अंबादास दानवे 

ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही नावं जवळपास निश्चित असल्याचं आता समजतं आहे. पण आता यापैकी नेमकं कोणाला तिकीट मिळतं हे आपल्याला अधिकृत यादी जाहीर झाल्यावरच समजू शकतं. 

    follow whatsapp