Lok Sabha Election 2024: भाजपकडून अखेर अमरावतीचा उमेदवार जाहीर, 'यांचं' तिकीट कापलं!

मुंबई तक

27 Mar 2024 (अपडेटेड: 27 Mar 2024, 07:52 PM)

Navneet Rana: भाजपने आपली सातवी यादी जाहीर करताना Lok Sabha Election 2024 साठी अमरावतीचा उमेदवार जाहीर केला आहे. तर शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचा पत्ता मात्र कट झाला आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणांना दिली उमेदवारी

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणांना दिली उमेदवारी

follow google news

BJP Amravati Candidate Navneet Rana: अमरावती: लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाली असून आता नवनव्या घडामोडी या वेगाने घडत आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून अमरावतीतील महायुतीच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स हा कायम होता. मात्र, आज (27 मार्च) याबाबत एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. (lok sabha election 2024 bjp announces amravati candidate navneet rana ticket announced shiv sena leader anandarao adsul candidature rejected)

हे वाचलं का?

महायुतीत अमरावतीच्या जागेवरून बरीच रस्सीखेच ही सुरू होती. कारण शिवसेना (शिंदे गट) हे सातत्याने या जागेवर दावा करत होते. मात्र, ती जागा स्वत:कडे खेचून आणण्यात भाजपला यश आलं असून या जागेवर भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून नवनीत राणा यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

2019 लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना पराभूत करत अपक्ष खासदार म्हणून निवडून येण्याचा पराक्रम केला होता. मात्र, त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा बराचसा फायदा झाला होता. कारण त्यावेळी राष्ट्रवादीने तिथे उमेदवार दिला नव्हता. ज्याचा थेट फायदा हा राणांना झालेला. मात्र, निवडून आल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे भाजपच्या बाजूने झुकले. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना प्रामुख्याने मुख्यमंत्री ठाकरेंना घेरण्यात राणा दाम्पत हे सर्वाथ आघाडीवर होते. त्यामुळे मागील पाच वर्ष भाजपसोबत राहिल्याने आता नवनीत राणा यांना भाजपने तिकीट देत त्याच आपल्या अधिकृत उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

शिवसेनेच्या (शिंदे गट) आनंदराव अडसूळ यांचं तिकीट कापलं!

मात्र, यामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचं तिकीट महायुतीत कापलं गेल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण या जागेसाठी आनंदराव अडसूळ हे खूप आग्रही होते. पण भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देत आनंदराव अडसूळ यांचा पत्ता कट केला आहे. जो शिंदे गटासाठी देखील एक मोठा धक्का मानला जात आहे.

 

 

    follow whatsapp