Lok Sabha election : भाजपचा होणार मोठा विजय! अमेरिकेतील विश्लेषकाने सांगितला आकडा

मुंबई तक

• 09:02 PM • 22 May 2024

Lok Sabha Election 2024 : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देखील लोकसभा निवडणुकीबाबत मोठं भाकित केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापण करेल. भाजप यावेळी 2019 इतक्या 303 जागांच्या जवळपास किंवा त्याहून अधिक जागा जिंकू शकते.

lok sabha election 2024 political scientists ian bremmer lok sabha poll prediction pm narendra modi

भाजप यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 295 ते 315 जागा जिंकेल.

follow google news

Lok Sabha Election Result Prediction : देशात लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे यशस्वीरीत्या पार पडले आहे. अजून सहाव्या आणि सातव्या अशा दोन टप्प्यात मतदान पार पडायचे बाकी आहे. त्याआधीच लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार भाजप यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 295 ते 315 जागा जिंकेल, असा अंदाज अमेरिकचे राजकीय शास्त्रज्ञ इयान ब्रेमर (Ian Bremmer) यांनी व्यक्त केला आहे. (lok sabha election 2024 political scientists ian bremmer lok sabha poll prediction pm narendra modi)

हे वाचलं का?

अमेरीकेचे राजकीय शास्त्रज्ञ आणि जागतिक राजकीय जोखीम सल्लागार इयान ब्रेमर यांनी मंगळवारी एनडीटीव्ही प्रॉफिटला एका विशेष मुलाखतीत दिली आहे. या मुलाखतीत इयान ब्रेमर यांनी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल कसा लागेल? याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे. 

हे ही वाचा : 'संधी असेल तर पुरेपूर फायदा घ्यायचा...', पवारांचा मास्टर प्लॅन!

लोकसभा निवडणुकीत भाजप 305 पेक्षा अधिक किंवा कमी जागा जिंकेल, असा अंदाज आहे. एकूणच भाजपला लोकसभा निवडणुकीत 295-315 जागा जिंकता येतील असा अंदाज इयान ब्रेमर यांनी वर्तवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भापज पक्ष सलग तिसऱ्यांदा निवडून येणार आहे. याआधी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 282 जागा (NDA मित्रपक्षांसह  336) आणि 2019 च्या निवडणुकीत 303 (NDA मित्रपक्षांसह 353) जागा जिंकली होती. 

प्रशांत किशोरांचं भाकित काय ? 

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देखील लोकसभा निवडणुकीबाबत मोठं भाकित केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापण करेल. भाजप यावेळी 2019 इतक्या 303 जागांच्या जवळपास किंवा त्याहून अधिक जागा जिंकू शकते.

हे ही वाचा : 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर BJP च्या कपिल पाटलांविरोधात गुन्हा दाखल

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की, मला वाटतं की मोदींच्या नेतृत्वात भाजप सत्तेत परत येताना दिसत आहे. त्यांना मागच्या वेळी मिळाल्या तेवढ्या किंला त्याहून काहीअंशी जास्त जागा मिळू शकतात. भाजपच्या 370 जागांच्या टार्गेटबद्दल विचारले असता प्रशांत किशोर म्हणाले की, जर भाजपने 275 जागा जिंकल्या, तर त्यांचे नेते आम्ही सरकार बनवणार नाही. कारण आम्ही 370 जागा जिंकण्याचा दावा केला होता असे म्हणणार नाही. 

दरम्यान आता या विश्लेषकांचे हे अंदाज खरे ठरतात का? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 

    follow whatsapp