Lok Sabha : मतदानाच्या दिवशी पोलिसांना शिवीगाळ... BJP च्या कपिल पाटलांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 case register against bjp bhiwandi lok sabha candidate kapil patil abuse statement for police
कपिल पाटील यांनी पोलिसाला शिविगाळ केल्याची घटना घडली होती.
social share
google news

Kapil Patil, Lok Sabha 2024 : भिवंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुरेश घुगे यांच्या तक्रारीवरून भिवंडीच्या (Bhiwandi Lok sabha) शांतीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिल पाटील (Kapil Patil) यांनी मतदान केंद्रावर कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला (police) शिविगाळ केल्याची घटना घडली होती.या संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.त्यानंतर आता कपिल पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (lok sabha election 2024 case register against bjp bhiwandi lok sabha candidate kapil patil abuse statement for police)

महाराष्ट्रात पाचव्या टप्प्याचे मतदान सुरु असताना कपिल पाटील भिवंडी मतदार संघातील खंडूपाडा बाला कंपाऊड मिल्लत नगर येथील अल्पसंख्याक बहुल असलेल्या मतदान केंद्रावर दाखल झाले होते. या मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला होता. याच घटनेवरून कपिल पाटील प्रचंड चिडले होते आणि त्यांनी मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. 

हे ही वाचा : दोघांना उडवलं; बापाला बेड्या अन् पबमधला 'तो' व्हिडिओ... वाचा Detail Story

कपिल पाटील यावेळी दमदाटी करत असताना त्यांच्या तोंडून अपशब्द देखील बाहेर पडले होते. व्हायरल व्हिडिओत मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांच्या गराड्यात असताना इतर ठिकाणी का गर्दी आहे? असा दम देत, तेथील आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना दादागिरीच्या भाषेत 'डोळे फुटलेत का तुझे भ&@# तिकडे काय &@#** मारतो का?' असे बेताल वक्तव्य करताना पाटील व्हिडिओमध्ये दिसत होते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एक जबाबदार लोकप्रतिनिधी आणि केंद्रीय मंत्री असलेले कपिल पाटील हे जर पोलिसांशी अशा भाषेत बोलत असतील आणि सार्वजनिकरित्या अशा प्रकारचं वर्तन केल्याने भिवंडीमधील अनेक नागरिकांनी त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. 

हे ही वाचा : शिंदेंचाच नेता म्हणतोय, ठाकरेंचा 'हा' उमेदवार "डायरेक्ट खासदार होणार"!

दरम्यान आता या प्रकरणात कपिल पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर कर्तव्यावर  असलेल्या पोलीस निरीक्षकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे यांनी याबाबतची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.   
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT