Devendra Fadnavis : राज ठाकरेंना फडणवीसांची साद; म्हणाले, ''मोदींना पाठिंबा द्या''

ऋत्विक भालेकर

08 Apr 2024 (अपडेटेड: 08 Apr 2024, 02:48 PM)

Devendra Fadnavis On Bjp-MNS Alliance : ाज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष महायुतीसोबत राहिलं. पंतप्रधान मोंदींसोबत राहिल. माझी त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. त्यांनी (राज ठाकरे) मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे. अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे, असे देखील फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

raj thackeray should support narendra modi devendra fadnavis statement nagpur bjp mns alliance mns gudhi padwa meleva maharashtra politics

''राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष महायुतीसोबत राहिल आणि त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे''

follow google news

Devendra Fadnavis On Bjp-MNS Alliance : ''राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष महायुतीसोबत राहिल आणि त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे'', अशी माझी अपेक्षा असल्याचे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विशेष म्हणजे फडवीसांच्या या विधानानंतर त्यांना पुन्हा मनसेला साद का घालावी लागतेय. असा प्रश्न उपस्थित होतो. कारण काहीच दिवसापुर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्यात भापज-मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे नेमकी झाली आहे की नाही? हे स्पष्ट होऊ शकले नाही. (raj thackeray should support narendra modi devendra fadnavis statement nagpur bjp mns alliance mns gudhi padwa meleva maharashtra politics) 

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस नागपूरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, मनसेने जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला, तेव्हापासून आमची त्यांच्याशी जवळीक वाढली आहे. मनसेशी काही चर्चा या गेल्या काळात आमच्याशी झालेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.  

हे ही वाचा : "संजय राऊत मुख्य सूत्रधार, त्यांना अटक करा", निरुपमांच्या आरोपाने खळबळ

राज ठाकरेंनी 2014 साली मोदींना पंतप्रधान बनवण्याची जाहीर भूमिका घेतली होती. मध्यल्या काळात त्यांनी वेगळी भूमिका घेतली असेल. पण जी लोक राष्ट्रीय विचाराने प्रेरीत आहेत. ज्यांच्यासाठी समाज आणि राष्ट्र प्रथम आहे. अशा सगळ्या लोकांनी मोदींसोबत राहिलं पाहिजे. म्हणून राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष महायुतीसोबत राहिलं. पंतप्रधान मोंदींसोबत राहिल. माझी त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. त्यांनी (राज ठाकरे) मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे. अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे, असे देखील फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात त्यांची भूमिका जाहीर करणार आहे. या संदर्भातला टीझरही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरमध्ये ते भाजप-मनसेच्या युतीवरून सूरू असलेल्या चर्चांवर भाष्य करणार आहेत. त्यामुळे आता भाजप-मनसेची युती होते का? महायुतीचा ते सत्तेत जातात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हे ही वाचा : "शिंदेंवर खूप दबाव...", तिकीट कापल्यानंतर तुमानेंनी सोडलं मौन

दरम्यान काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनतर भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या दरम्यान राज ठाकरे आणि भाजपमध्ये अनेक जागांवर चर्चा देखील झाली होती. यामध्ये राज ठाकरेंनी तीन जागांची मागणी देखील केली होती. मात्र या मागणीवर पुढेच काहीच निर्णय झाला होता. 

त्यात आता राज ठाकरे उद्या गुढीपाडव्याच्या मेळाव्या निमित्त शिवतीर्थावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा द्यावा, यासाठी देंवेंद्र फडणवीसांनी मनसेला साद घातली आहे. आता राज ठाकरे यावर काय निर्णय घेतात?  याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

...तर मोदींना मतं पडतील

माझा शरद पवारांना सवाल आहे. शरद पवार बारामतीत उमेवदवार नाहीत. सुनेत्रा पवार निवडून आल्या तर मोदींसाठी हात उंचावतील आणि सुप्रिया सुळे निवडून आल्या तर राहुल गांधींसाठी हात उंचावतील.  सुनेत्रा ताईंना मतं मिळाली तर ती मोदींना पडतील, सुप्रीया ताईंना मतं मिळाली तर ती राहुल गाधींना पडतील. हे काही लोकांना समजत नाही आहे. तर आम्ही काय करणार? असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर फडणवीस म्हणाले की, भाजपमध्ये मोदींवर विश्वास ठेऊन कोणीही प्रवेश करत असेल, तर त्याला कोणाचा विरोध असल्याच कारणच नाही.. अजून अधिकृतरित्या पक्षाने आम्हाला कळवलेलं नाही.. जेव्हा पक्ष अधिकृतरित्या आम्हाला कळवेल तेव्हा आम्ही त्यांचे स्वागत करू, असे त्यांनी म्हटले आहे. 

    follow whatsapp