Madha Lok Sabha election 2024 : शरद पवारांकडून शिक्कामोर्तब! माढ्यासाठी केली उमेदवाराची घोषणा

मुंबई तक

14 Apr 2024 (अपडेटेड: 14 Apr 2024, 02:01 PM)

Madha Lok Sabha election 2024, Sharad Pawar, Dhairyashil Mohite patil : माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत होणार, हे स्पष्ट झाले आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची शरद पवार यांनी घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार.

follow google news

Madha Lok Sabha election 2024, dhairyashil mohite patil, Sharad Pawar : (नितीन शिंदे, माढा) माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, हा सस्पेन्स आता अधिकृतपणे संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशीच लढत होणार, हे स्पष्ट झाले आहे. (Dhairyashil mohite patil will be contest as ncp sharad pawar party candidates from madha lok sabha)

हे वाचलं का?

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यापूर्वी ते म्हणाले की, "या भागातील महत्त्वाचे तीन-चार पक्षाचे नेते आज इथे उपस्थित आहेत. मला एका गोष्टीचं समाधान आहे की, या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत; त्या सगळ्यांना विजयी करण्यासाठी जे जे काही करावे लागेल, ते करण्याची तयारी ठेवली आहे."

धैर्यशील मोहिते पाटील करणार पक्षप्रवेश

"माढा मतदारसंघात आम्हा सगळ्यांची इच्छा होती की, ही निवडणूक आमच्यावतीने धैर्यशील मोहिते पाटील यांनी लढवावी आणि आज आम्ही त्यांना सूचना वजा विनंती केली की, तुम्ही पक्षात येण्याचा निर्णय घ्यावा. आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील या ठिकाणी येतील. बाकीचे सहकारी असतील. या सगळ्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा निर्णय होईल."

हेही वाचा >> "चारशे पार काय सगळी लोकसभाच घ्या ना"; शिंदेंच्या नेत्याची भाजपवर घणाघाती टीका

प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या मताने विजयी होतील -शरद पवार

"उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख १६ आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज सोलापूरला भरले जातील. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर चित्र बदलेलं दिसेल. सोलापूर जिल्हा पुरोगामी आणि नेहमीच गांधी-नेहरूंच्या विचारांचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. माझी खात्री आहे की, या जिल्ह्याचा पूर्वीचा सगळा इतिहास बघितला तर या निवडणुकीमध्येही आमचे दोन्ही उमेदवार प्रणिती शिंदे आणि ज्यांच्याकडे आपण आता बसलोय (धैर्यशील मोहिते पाटील) त्यांच्यासह हे मोठ्या मताने विजयी होतील. अशी खात्री आमच्या सर्व सहकाऱ्यांनी दिली आहे."

हेही वाचा >> राज ठाकरे आणि MNS ची कहाणी येणार पडद्यावर! गुढीपाडवा मेळाव्यात काय घडलं?

शरद पवार पुढे म्हणाले की, "माण खटाव, फलटण, सांगोला, माळशिरस, करमाळा आणि माढा या सगळ्या भागातील सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या निवडणुकीत लीड देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे, त्याचे आम्हा लोकांना समाधान आहे."

    follow whatsapp