Gajanan Kirtikar : "चारशे पार काय सगळी लोकसभाच घ्या ना"; शिंदेंच्या नेत्याची भाजपवर घणाघाती टीका

भागवत हिरेकर

Gajanan kirtikar : शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मुलाला क्लिनचिट देत भाजपवर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी आणि गजानन कीर्तिकर.
गजानन कीर्तिकर यांची भाजपवर टीका.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गजानन कीर्तिकर यांचा भाजपवरच हल्लाबोल

point

मुलगा अमोल कीर्तिकर निर्दोष असल्याचा दावा

point

ईडी चौकशीवरून व्यक्त केला संताप

Gajajan Kirtikar on BJP, Amol Kirtikar and lok Sabha election : भाजप एकीकडे 'चारशे पार'चा नारा देत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी घणाघाती टीका केली आहे. 'चारशे पार काय सगळी लोकसभाच घ्या ना', असे म्हणत कीर्तिकरांनी टीका केली आहे. इतकंच नाही, तर मुलगा अमोल कीर्तिकर यांच्याबद्दल भाजपकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देत त्यांनी क्लिनचीट दिली आहे. (Gajanan Kirtikar, Leader of Eknath shinde's Shiv sena has Recites BJP)

गजानन कीर्तिकर यांनी एका मुलाखतीत ही भूमिका मांडली असून, याबद्दलचे वृत्तही माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, कीर्तिकरांच्या विधानामुळे ईडीच्या चौकश्यांही संशयाच्या भोवऱ्यात आल्या आहेत. 

Gajanan Kirtikar : कीर्तिकर नेमके काय बोलले?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी काय म्हटलं आहे, हे आधी वाचा...

कीर्तिकर म्हणतात, "ही जी पद्धती आणि संस्कृती आणलेली आहे भाजपने ती घातक आहे. आता चारशे पार ते (भाजप) करतायेत. मोदींना पंतप्रधान करू आम्ही, पण भाजपची ही जी वृत्ती आहे, ही त्यांना फार अडचणीत आणणारी आहे", अशी टीका त्यांनी केली आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp