न्याय पत्र Vs संकल्प पत्र! भाजप-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात फरक काय?

रोहिणी ठोंबरे

14 Apr 2024 (अपडेटेड: 14 Apr 2024, 04:44 PM)

BJP-Congress manifesto : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा (BJP Manifesto) प्रसिद्ध केला आहे.  मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प या नावाने भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षानेही  'न्याय पत्र' या नावाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.

Mumbaitak
follow google news

BJP-Congress manifesto : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा (BJP Manifesto) प्रसिद्ध केला आहे.  मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प या नावाने भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षानेही  'न्याय पत्र' या नावाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. (What is the difference between BJP-Congress manifesto nyay patra vs Sankalpa Patra

हे वाचलं का?

देशातील सत्ता संघर्षाच्या या शर्यतीत कोण बाजी मारणार याकडे देशवासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. भाजप आणि काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या या जाहीरनाम्यात नेमका फरक काय? हे आज आपण मुंबई Tak च्या या बातमीतून सविस्तर समजून घेऊयात.

'न्याय पत्र' असे नाव काँग्रेसने जाहीरनाम्याला दिले होते. यावेळी त्यांनी मोठी आश्वासने दिली. यामध्ये 25 प्रकारच्या गॅरंटी दिल्या असून, सत्तेत आल्यास MSP संदर्भात कायदा करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे. आरक्षणाच्या मुद्दाही काँग्रेसने अजेंड्यावर घेतला आहे, त्यासाठी जात जनगणना करण्याची घोषणाही केली आहे.

तर, भाजपने त्यांच्या संकल्प पत्रात गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस यासह मोठ्या घोषणा केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

संकल्प पत्राबाबत बोलताना PM मोदी म्हणाले की, “आज अतिशय शुभ दिवस आहे. आज काही राज्यात नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. संपूर्ण भारताला भाजपाच्या संकल्प पत्राची प्रतिक्षा होती. भाजपाने दिलेले सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. देशातील जनतेला भाजपावर विश्वास आहे. हा जाहीरनाम्यामध्ये युवा, शेतकरी, नारी शक्ती, गरीबांवर आधारीत आहे. 

भारतीयांचे जीवनमान उंचवण्याकडे आमचा फोकस आहे. गरीबांच्या जेवणाची धाळी पोषणयुक्त असावी, असा आमचा संकल्प आहे. मोफत राशनची योजना पुढील पाच वर्ष सुरु राहणार आहे. ७० वर्षावरील वद्धांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे, गरीबांसाठी ३ कोटी घरे बांधण्याचा आमचा संकल्प आहे. आता घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे." 

    follow whatsapp