Noor Malabika Das : मुंबईत बॉलिवूड अभिनेत्रीची आत्महत्या, घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Noor Malabika Das Suicide : अभिनेत्रीने तिच्या लोखंडवाला परिसरातील राहत्या घरात पंख्याला लटकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर ओशिवारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा तोडला असता ही घटना उघडकीस आली होती.

 'द ट्रायल' वेबसीरीजमध्ये झळकलेल्या अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना घडली.

the trail actress noor malabika das suicide found dead in apartmnt bollywood news

मुंबई तक

10 Jun 2024 (अपडेटेड: 10 Jun 2024, 05:02 PM)

follow google news

The Trial Noor Malabika Das dies: वेबसीरीजच्या विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. 'द ट्रायल' वेबसीरीजमध्ये झळकलेल्या अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना घडली. नूर मालाबिका दास (Noor Malabika Das)  (वय 37) असे या आत्महत्या केलेल्या अभिनेत्रीचे नाव आहे. घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत नुरचा मृतदेह आढळला आहे. अभिनेत्रीच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच या घटनेने मनोरंजन विश्वात खळबळ माजली आहे. (the trail actress noor malabika das suicide found dead in apartmnt bollywood news) 

हे वाचलं का?

मिडे डेने दिलेल्या वृत्तानसुार, अभिनेत्रीने तिच्या लोखंडवाला परिसरातील राहत्या घरात पंख्याला लटकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर ओशिवारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा तोडला असता ही घटना उघडकीस आली होती. 

हे ही वाचा : एकही खासदार नसताना मोदी मंत्रिमंडळात आठवलेंची सीट का असते फिक्स?

घरात अभिनेत्रीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडला होता आणि त्यामधून दुर्गंधी देखील येत होती. अभिनेत्रीचा मृतदेह पंख्यावर लटकला होता. पोलिसांनी हा मृतदेह खाली उतरवून गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच पोलिसांनी अभिनेत्रीच्या घरातून तपासादरम्यान काही गोळ्या, मोबाईल फोन आणि डायरी देखील जप्त केली आहे. पण अद्याप तरी अभिनेत्रीच्या मृत्यूचे  कारण समोर आले नाही आहे. 

पोलिसांनी अभिनेत्रीच्या कुटुंबियाशी संपर्क साधआला होता, मात्र कोणीही पुढे आले नाही. कुटुंबातील कोणीही मृतदेह घेण्यासाठी न आल्याने पोलिसांनी शहरातील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने रविवारी 9 जून रोजी अंत्यसंस्कार केले होते. 

हे ही वाचा : मुंबई-ठाण्याला पाऊस झोडपणार! IMD कडून 'सतर्कतेचा' इशारा

दरम्यान नुर माबालिका मुळची आसामची रहिवाशी होती. तिने अनेक वेब सीरीज आणि सिनेमात काम केले आहे. द ट्रायल या वेबसीरीजमध्ये तिने काजल देवगण सोबत काम केले होते. तसेच सिसकीया, वॉकमॅन, तिखी चटणी, जघन्या उपाय, चरमसुखस देखी अनदेखी, बैकरोड हलचल सारख्या सिनेमा आणि वेबसीरीजमध्ये अभिनय केला होता. 

    follow whatsapp