Mumbai Weather Update : मुंबई-ठाण्याला पाऊस झोडपणार! IMD कडून 'सतर्कतेचा' इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

मान्सूनचे मुंबईत ९ जून रोजी आगमन झाले. त्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे.
मुंबई, ठाणे परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई पाऊस अपडेट

point

हवामान विभागाकडून मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

point

ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

Mumbai Rains Alert : दोन दिवस आधीच आगमन झालेल्या मान्सूने मुंबईला झोडपून काढले. रविवारी (9 सांयकाळी) पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीपर्यंत जोर कायम होता. पुढील दोन दिवसही मुंबईत अतिमुसळधार पाऊस बसण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून मुंबई, मुंबई उपनगरांसह ठाण्यासाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा. (IMD has predicted heavy rain in Mumbai) 

एरवी ११ जूननंतर मुंबईत येणारा मान्सून यावेळी दोन दिवस आधीच म्हणजे ९ जून रोजीच धडकला. प्रचंड उकाड्याने त्रस्त असलेल्या चाकरमान्यांना पावसाने रस्त्याच गाठले. त्यामुळेच चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला.ठाणे जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. 

मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

मान्सून सक्रिय झाल्यामुळे मुंबईत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून १० जून आणि ११ जून रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांचा कडकडाटासह मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. या काळात वाऱ्यांचा वेगही वाढेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> असे आहे मोदींचे मंत्रिमंडळ, वाचा संपूर्ण यादी

 

हेही वाचा >> भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'कॅबिनेट मंत्रिपद' का दिलं नाही?

ठाण्याला ऑरेंज अलर्ट

ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. १० जून आणि ११ जून रोजी ठाणे शहर आणि जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज IMDने व्यक्त केला आहे. १२ जूननंतर पावसाचा जोर ओसरू शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT