Shah Rukh Khan : सनी देओलने शाहरुखमुळे फाडली होती स्वतःची पॅन्ट; किस्सा काय?

Shah Rukh Khan News : 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या डर चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटात शाहरुख खान, सनी देओल आणि जुही चावला यांच्याप्रमुख भूमिका होत्या.

डर चित्रपटातील न ऐकलेला किस्सा.

शाहरुख खानमुळे सनी देओलला राग अनावर झाला होता.

मुंबई तक

• 09:05 PM • 17 Jul 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

शाहरुख खान आणि सनी देओलचा किस्सा

point

डर चित्रपटाच्या शुटिंगवेळी काय घडलं होतं?

point

सनी देओलने का फाडून घेतली होती पॅन्ट?

Bollywood Gossip News : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि शाहरुख खानचा साल १९९३ मध्ये आलेला डर हा चित्रपट हिट झाला होता. फक्त ३.२५ कोटी रुपयांत तयार झालेल्या या चित्रपटाने २१ कोटींचा गल्ला कमावला होता. या चित्रपटानंतरच सनी देओलने यश राज फिल्म्स सोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. याच चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा एक किस्सा सांगितला जातो. 

हे वाचलं का?

सनी देओलने का फाडली होती स्वतःचीच पॅन्ट?

सेटवर असताना इतका राग आला की, मी माझी पॅन्ट फाडली होती, असा किस्सा सनी देओलने एका मुलाखतीत सांगितला होता.शुटिंगवेळी जेव्हा हे घडले, तेव्हा चित्रपटाचे अॅक्शन दिग्दर्शक टीनू वर्मा हे सेटवरच होते.

हेही वाचा >> 'मी दिवसाला 60 सिगारेट प्यायचो', नानांनी सांगितली मुलाच्या मृत्यूनंतरची वेदना 

आता एका मुलाखतीत सनी देओलने सांगितले की, चित्रपटात शाहरुख खान माझ्यावर समोरून हल्ला करू शकत नव्हता. कारण माझी भूमिका नोदल अधिकाऱ्याची होती. 

डर चित्रपटाच्या सेटवर काय घडले होते?

टीनू शर्माने सांगितले होते की, "सनी देओलचे म्हणणे होते की, शाहरुख खान समोरून हल्ला करू शकत नाही, कारण मी नोदल अधिकारी आहे. सनी देओलचे म्हणणे बरोबर होते."

"शाहरुख खानचे म्हणणे होते की, मी शक्ती कपूर, प्रेम चोपडा किंवा गुलशन ग्रोवर नाहीये आणि मी पाठीमागून हल्ला करणार नाही." हा पेच निर्माण झाल्यामुळे दिग्दर्शक यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा सेटवर आले.

हेही वाचा >> सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह सापडलेल्या 'त्या' फ्लॅटमध्ये 'ही' अभिनेत्री झाली शिफ्ट! 

शुटिंग दरम्यान तणाव निर्माण झाला होता. या सगळ्या गोष्टीमुळे सनी देओलला खूपच राग आला होता. सनी देओल खिशात हात घालून उभा होता. रागात त्याने जोर दिला आणि त्याची पॅन्टच फाडली. तिथे उपस्थित असलेले सगळे बघतच राहिले. शाहरुख खानही तेव्हा तिथेच होता. त्यानंतर पॅकअप करण्यात आले. नंतर हा सीन बदलण्यात आला.

    follow whatsapp