Nana Patekar: 'मी दिवसाला 60 सिगारेट प्यायचो', नानांनी सांगितली मुलाच्या मृत्यूनंतरची वेदना
Nana Patekar : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतेच एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मोठ्या मुलाच्या निधनानंतर त्यांना सिगारेटचे व्यसन लागले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'एका दिवसाला 60 सिगारेट ओढायचो'

बहिणीच्या त्या वक्तव्याने बदलले आयुष्य...
Nana Patekar Speaks on his Son's Death : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतेच एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मोठ्या मुलाच्या निधनानंतर त्यांना सिगारेटचे व्यसन लागले होते. ते दिवसाला 60 सिगारेट प्यायचे. पण हे व्यसन सोडण्याचे कारण म्हणजे त्यांची बहीण होती. त्यांनी सांगितले की, 'ज्या दिवशी त्यांच्या बहिणीचं ते वक्तव्य त्यांच्या मनाला लागलं तेव्हापासून त्यांनी सिगारेटला हात लावला नाही.' (I used to smoke 60 cigarettes a day Nana reveals pain after son's death)
'एका दिवसाला 60 सिगारेट ओढायचो'
'द ललनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांच्या मोठ्या मुलाबद्दल बोलताना त्याचे नाव दुर्वास असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या मुलाचे नाव दुर्वास ऋषींच्या नावावर ठेवले, जे आपल्या क्रोधासाठी प्रसिद्ध होते.
हेही वाचा : T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानने रचला इतिहास, ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर
अडीच वर्षांचा असताना त्याचा मृत्यू झाल्याचे नानांनी सांगितले. 'त्याला जन्मापासूनच काही आरोग्य समस्या होत्या, त्यामुळे त्याचे ओठ थोडे फाटले होते आणि एका डोळ्यात समस्या होती त्यामुळे त्याला दिसत नव्हते.'
नाना म्हणाले, 'मी इतका वाईट माणूस आहे की त्याला पाहिल्यावर लोक काय विचार करतील... नानांचा मुलगा कसा आहे, असा विचार मी केला. त्याला काय वाटत असेल, कसं वाटत असेल याचा काहीच विचार केला नाही. माझ्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील असा प्रश्न मला पडायचा. त्याचे नाव होते दुर्वास. अडीच वर्षांचा असताना त्यांचा मृत्यू झाला. पण काय करणार, आयुष्यात काही गोष्टी घडतात.'