AFG vs BAN T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानने रचला इतिहास, ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर
T20 world cup semi final teams : अफगाणिस्तानने टी20 विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचला आहे. अफगाणिस्तान संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ बाहेर गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अफगाणिस्तान टी20 विश्व चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत
ऑस्ट्रेलिया टी20 विश्व चषक स्पर्धेतून बाहेर
AFG vs BAN T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल होत अफगाणिस्तान संघाने इतिहास रचला. अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारल्याने ऑस्ट्रेलियाचे स्वप्न भंगले आहे. (Afghanistan entered in Semi final, Australia out from T20 world cup 2024)
ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 मधील सुपर 8 मध्ये बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात रोमांचक सामना झाला. किंग्सटाउन येथील अर्नोस वेल मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने आले. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने बांगलादेशला विजयासाठी 114 (DLS) चे लक्ष्य दिले होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली. फजलहक फारुकीच्या चेंडूवर बांगलादेशने दुसऱ्याच षटकात तनजीद हसनची विकेट गमावली.
त्यानंतर नवीन उल हकने नझमुल हुसेन शांतो (5) आणि अनुभवी खेळाडू शकीब अल हसन (0) यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले.










