सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह सापडलेल्या 'त्या' फ्लॅटमध्ये 'ही' अभिनेत्री झाली शिफ्ट!
Bollywood News : अदाने गेल्या वर्षीच सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट भाड्याने घेतल्याची बातमी समोर आली होती. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री अदा म्हणाली होती की, मी जेव्हाही असा निर्णय घेईल तेव्हा तुम्हाला नक्की सांगेन.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अदा शर्मा खरंच सुशांतच्या फ्लॅटमध्ये राहते?
Adah Sharma Spoke on sushant singh Rajput Flat: गेल्या वर्षी बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेत्री अदा शर्माने मोठं नाव कमावलं. तिने अनेक चित्रपट केले पण, सुदीप्तो सेनच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटातून अदाला खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर अभिनेत्री 'बस्तर: द नक्सल स्टोरी'मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाई करू शकला नाही, पण चर्चेत राहिला. (bollywood actress adah sharma lives in that flat where Sushant Singh Rajput body found)
ADVERTISEMENT
अदाने गेल्या वर्षीच सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट भाड्याने घेतल्याची बातमी समोर आली होती. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री अदा म्हणाली होती की, मी जेव्हाही असा निर्णय घेईल तेव्हा तुम्हाला नक्की सांगेन.
हेही वाचा : Exit Poll : शरद पवार 'इतक्या' जागा जिंकणार? अजित पवारांना किती? पाहा यादी
अदा शर्मा खरंच सुशांतच्या फ्लॅटमध्ये राहते?
आता बातम्या येत आहेत की अदा सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये अदाने सुशांतचा फ्लॅट 3 वर्षांसाठी भाड्याने घेतला. एका मुलाखतीत बोलताना अदा म्हणाली, 'चार महिन्यांपूर्वी मी सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. शिफ्ट झाल्यानंतर मी माझ्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. मला जास्त वेळ मिळाला नाही. यानंतर मी मथुरेच्या हत्ती अभयारण्यात गेले. तिथून परत आल्यानंतर मला या फ्लॅटमध्ये राहायला मिळालं आहे. माझी आई आणि आजी आम्ही सर्वजण या फ्लॅटमध्ये एकत्र राहतो.'
हे वाचलं का?
हेही वाचा : महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये 'हे' उमेदवार जिंकणार? संपूर्ण यादी
अदा पुढे म्हणाली की, 'आता मला थोडा वेळ मिळाला आहे, त्यामुळे मी फ्लॅटमध्ये पूर्णपणे स्थायिक होऊ शकले आहे. मी पाली हिल येथे एका घरात राहत होते. तिथे माझे बालपण गेले. त्याच्याशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. मुंबईत कुठेतरी शिफ्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा फ्लॅट मला खूप सकारात्मक भावना देतो. मी vibes बद्दल खूप संवेदनशील आहे.'
हेही वाचा : Exit Poll: MVA चा तब्बल 'एवढ्या' जागांवर होणार विजय? पाहा यादी
'द केरळ स्टोरी' दरम्यान, मी निसर्गाच्या सान्निध्यात बराच वेळ घालवला. मला असे वाटले की मी अशा ठिकाणी राहावं जिथे मी पक्ष्यांची काळजी घेऊ शकेन आणि त्यांना खायला घालू शकेन. मी ज्या घरात राहत होते तिथे जागेची कमतरता होती. म्हणूनच मी या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले जेणेकरुन मी पक्ष्यांना खायला घालू शकेन. माझं हे स्वप्न मी पूर्ण करत आहे. या घरात खूप जागा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT