मुलाच्या प्रेमाची शिक्षा आईला, गव्हाच्या शेतात सामूहिक बलात्कार करुन केली हत्या, प्रेयसीच्या कुटुंबियांचे कृत्य
Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाचे गावातीलच तरुणीवर प्रेम होते. मात्र त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी हा प्रतिष्ठेचा विषय केला. त्यांनी त्या तरुणाच्या आईलाच घरातून उचलून नेले आणि गावातील एका गव्हाच्या शेतात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर तिची हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलाच्या प्रेमाची शिक्षा आईला
गव्हाच्या शेतात सामूहिक बलात्कार करुन केली हत्या
प्रेयसीच्या कुटुंबियांचे कृत्य
Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाचे गावातीलच तरुणीवर प्रेम होते. मात्र त्या तरुणीच्या कुटुंबीयांनी हा प्रतिष्ठेचा विषय केला. त्यांनी त्या तरुणाच्या आईलाच घरातून उचलून नेले आणि गावातील एका गव्हाच्या शेतात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर तिची हत्या केली. उत्तर प्रदेशातील लखीमपूर परिसरातील ही घटना आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा : प्रेयसीनं अबोला धरला, प्रियकर स्कूटीवरुन 370 किमीचा प्रवास करुन पोहोचला अन् घडलं भयंकर
'त्या' दिवशी काय घडलं?
मृत महिलेचा मुलगा तेलंगणामध्ये कामाला असून त्याची आई, दोन लहान भाऊ आणि एक दोन वर्षांची बहीण गावात राहत होते. 23 फेब्रुवारी रोजी रात्री एका कौटुंबिक कार्यक्रमातून परतल्यानंतर, मध्यरात्री गावातील शिवतरन नावाचा व्यक्ती आणि त्याच्या साथीदारांनी घरात घुसून महिलेचे जबरदस्तीने अपहरण केले. यावेळी मुलांनी आईला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यालाही जीवे मारण्याची धमकी देऊन पळवून लावले. यानंतर महिलेला एका गव्हाच्या शेतात नेण्यात आले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर तिची हत्या करण्यात आली.
प्रेमप्रकरणाचा वाद
या भीषण हत्याकांडामागे जुना कौटुंबिक वाद आणि प्रेमप्रकरण कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. मृत महिलेच्या मुलाचे गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होते, ज्यावरून दोन्ही कुटुंबात वैमनस्य होते. याच वादातून मृत महिलेचा एक अल्पवयीन मुलगा सध्या तुरुंगात आहे. याच रागातून आरोपींनी सूड उगवण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.










