मोलकरणीने ED ची अधिकारी म्हणून मालकिणीच्या घरावर टाकली धाड, लाखो रुपये पळवले

मुंबई तक

crime news : आपण ईडीचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांनी घरातील सदस्यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी सर्वांचे मोबाईल फोन काढून घेतले आणि घराची झडती घेण्याचे नाटक केले. दरम्यान, सभरवाल यांचा नातू तिथे आला असता गोंधळ उडाला आणि आरोपींनी तिथून पळ काढला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोलकरणीने ED ची अधिकारी म्हणून मालकिणीच्या घरावर टाकली धाड

point

लाखो रुपये पळवले

crime news, नवी दिल्ली : राजधानीतील पॉश समजल्या जाणाऱ्या 'न्यू फ्रेंड्स कॉलनी' परिसरातून एक थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. एका मोलकरणीने आपल्या साथीदारांच्या मदतीने स्वतःच्या मालकाच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाचा (ED) बनावट छापा टाकून लाखोंची लूट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास चक्र वेगाने फिरवत दोन महिला आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

नेमकी घटना काय?

11 फेब्रुवारी 206 रोजी 86 वर्षीय निवृत्त वरिष्ठ आर्किटेक्ट आर.सी. सभरवाल यांच्या घरात तीन जण पोलीस गणवेशात शिरले. आपण ईडीचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांनी घरातील सदस्यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी सर्वांचे मोबाईल फोन काढून घेतले आणि घराची झडती घेण्याचे नाटक केले. दरम्यान, सभरवाल यांचा नातू तिथे आला असता गोंधळ उडाला आणि आरोपींनी तिथून पळ काढला. जाताना त्यांनी 3 ते 4 लाख रुपये रोख आणि सात महागड्या 'लक्झरी' घड्याळे चोरून नेली.

हेही वाचा : जळगाव : प्रेम संबंधातून विवाहितेच्या डोक्यात गोळी घालून स्वतःलाही संपवलं, मुलीनं दार उघडून पाहताच...

तपासात धक्कादायक खुलासे

या चोरीमागे घरगड्याचा हात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट साहित्य जप्त: आरोपींकडून बनावट ओळखपत्रे, पोलिसांचे गणवेश, वायरलेस सेट आणि एक पिस्तूल (ज्याचा परवाना संपलेला होता) जप्त करण्यात आले आहे. लुटलेला माल हस्तगत: पोलिसांनी चोरीला गेलेले दागिने आणि महागडी घड्याळे पुन्हा मिळवण्यात यश मिळवले आहे. सीसीटीव्ही आणि डिजिटल पुरावे: एसीपी रवी शंकर आणि एसएचओ राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुमारे 350 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. सराय काले खाँ ते गाझीपूर बॉर्डरपर्यंतच्या हालचालींवरून आरोपींचा माग काढला असता, त्यांची गाडी गाझियाबादच्या वैशाली (सेक्टर 4) मध्ये आढळून आली.
गुन्हा दाखल

हे वाचलं का?

    follow whatsapp