शिवजयंतीला ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत अफझलखान वधाचा विशेष भाग

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा प्रेक्षकांसमोर येतोय. तर इतिहासातील काळजाचा थरकाप उडणावणारी एक घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सेनेतील अफजलखान यांची भेट तसंच भेटीदरम्यान झालेला अफजलखानाचा वध. तर आता ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत अफझलखान वधाचा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या लोकप्रिय मालिकेत […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:58 PM • 17 Feb 2021

follow google news

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा प्रेक्षकांसमोर येतोय. तर इतिहासातील काळजाचा थरकाप उडणावणारी एक घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सेनेतील अफजलखान यांची भेट तसंच भेटीदरम्यान झालेला अफजलखानाचा वध. तर आता ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत अफझलखान वधाचा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

‘स्वराज्यजननी जिजामाता’ या लोकप्रिय मालिकेत ही रोमहर्षक मोहीम आता पहायला मिळणार आहे. शत्रूचे कपट, गुप्त कारस्थानांपुढे छत्रपती शिवाजी महाराज कधीच डगमगले नाहीत. संकटाच्या वेळी कल्पकता वापरून सहीसलामत बाहेर पडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची धैर्यवान बाजू त्यांच्या सगळ्या मोहिमांमधून आपल्याला दिसून येते.

अफझलखान वधाचे संपूर्ण नियोजन करताना शिवाजी महाराजांनी कशाकशाचा वापर केला तसंच आखणी कशी केली या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी विशेष भागात पहायला मिळणार आहे.

अफजलखानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी करून आणि हिंदवी स्वराज्यावर आलेले संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी परतवून लावलं. खानाचा वध हा आदिलशाहीला बसलेला सर्वात मोठा प्रहार मानला जातो. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील अत्यंत जोखमीची आणि तितकीच रोमहर्षक कामगिरी नेमकी कशी फत्ते झाली हे शिवजयंतीला ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत पाहू शकता.

    follow whatsapp