Actress Rupali Bhosale Car Accident : आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिचा अपघात झालाय. या अपघातात रुपाली भोसलेच्या कारचं मोठं नुकसान झालंय. तिने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून या कार अपघाताची माहिती दिली आहे. यामध्ये तिच्या मर्सिडिज कारचं मोठं नुकसान झालंय. शिवाय, अपघात झालाय, आजचा दिवस वाईट असल्याचंही तिने म्हटलंय. विशेष म्हणजे तिने कार काही महिन्यांपूर्वीच खरेदी केली होती.
ADVERTISEMENT
अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी नेहमी काहीना काही शेअर करताना पाहायाला मिळते. मात्र, आता तिने अपघात झाल्याची माहिती शेअर केल्यानंतर तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. रुपाली भोसले हिला आई कुठे काय करते? या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. तिने साकारलेल्या संजना या पात्राला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाली. तिने या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली आहे. मात्र, तरी देखील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
हेही वाचा : Maharashtra हवामानाचा अंदाज: मराठवाड्याला पावसाचा पुन्हा अलर्ट, गरज असेल तरच घरातून बाहेर पडा!
रुपाली भोसले अनेक मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, तिला 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे ओळख मिळाली. तिने या वर्षी जानेवारी महिन्यात ही कार खरेदी केली होती. दरम्यान, तिने खरेदी केलेल्या मर्सिडिज कारच्या बोनेट तुटल्याचं पाहायला मिळतंय. सध्या अभिनेत्री रुपाली भोसले स्टार प्रवाहवरील लपंडाव या मालिकेत देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत देखील तिने नकारात्मक भूमिका स्वीकारली आहे.
Solapur Flood 2025 : Jyoti Waghmare यांना जिल्हाधिकारी Kumar Ashirwad यांनी का सुनावलं?| Shiv Sena
ADVERTISEMENT
