Vasant Kubal Passed Away : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. अलका कुबल (Alka Kubal) यांचे मोठे भाऊ आणि मराठी सिनेसृष्टीतील चित्रपट संकलक वसंत कुबल (Vasant Kubal) यांचं वयाच्या 65 व्या वर्षी निधन झालंय. वसंत कुबल यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीये. गेल्या महिन्याभरापासून वसंत कुबल (Vasant Kubal) यांना Paralysis चा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर राहत्या घरातच उपचार सुरु होते. दरम्यान, वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्यावर शनिवारी (दि.27) मुंबईत अंत्यसंस्कार पार पडले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: कमी बजेट असेल तरी सोन्यात गुंतवणूक करू शकता, त्यासाठी सोनं खरेदी करायचीही नाही गरज!
वसंत कुबल यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा
मराठी चित्रपटसृष्टीत वसंत कुबल हे अनुभवी आणि संवेदनशील संकलक म्हणून विशेष ओळखले जात. संपादन क्षेत्रात त्यांनी तब्बल चार दशकांहून अधिक काळ कार्य केलं. ‘कुंकू लावते माहेरचे’, ‘परीस’, ‘चॅम्पियन्स’, ‘लढाई’, ‘माय माऊली मनुदेवी’, ‘स्नेक अँड लॅडर’ अशा विविध प्रकारच्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या संपादन कौशल्याची छाप उमटवली. त्यांच्या कामामुळे कथानकाला नेहमीच महत्त्व प्राप्त व्हायचं. त्यांच्या संपादन शैलीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम टिकून रहायची.
हेही वाचा : शिरुरमध्ये भावकीच सोडून गेली, पालकमंत्रिपदाची स्वप्न पाहात होता, त्याला सांगितलं आता तुला पाडणार : अजित पवार
वसंत कुबल निधनाची वार्ता समजताच मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. मराठी चित्रपटांना तांत्रिक कसोटी आणि कलात्मक उंची मिळण्यात वसंत कुबल यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या योगदानामुळेच या सिनेसृष्टीला दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली.
अलका कुबल रंगभूमीवर सक्रिय
अलका कबुल सध्या रंगभूमीवर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या त्या वजनदार या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. शिवाय सध्या त्या काही मालिकांची निर्मिती देखील करत आहेत. त्यांचा माहेरची साडी हा चित्रपट आज देखील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. हा सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा सिनेमा मानला जातो.
Dilip Prabhavalkar यांना अभियनापेक्षा करायचं होतं या गोष्टीत करिअर, नेमकं त्यांना काय बनायचं होतं?
ADVERTISEMENT
