शिरुरमध्ये भावकीच सोडून गेली, पालकमंत्रिपदाची स्वप्न पाहात होता, त्याला सांगितलं आता तुला पाडणार : अजित पवार
Ajit Pawar on Ashok Pawar : अजित पवारांनी शिरुरचे माजी आमदार अशोक पवार यांना टोला लगावलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शिरुरमध्ये माझी भावकीच मला सोडून गेली, अजित पवारांचं वक्तव्य

त्याला सांगितलं आता तुला पाडणार, अजित पवारांचा अशोक पवारांना टोला
Ajit Pawar on Ashok Pawar, Pune : "शिरुरमध्ये माझी भावकीच मला सोडून गेली. तो तर बिचारा पालकमंत्रिपदाची स्वप्न बघत होता. त्याला वाटलं सगळे अजितदादांच्या बरोबर गेले. आपण इकडं (महाविकास आघाडी) राहिलो की, आपल सरकार येणार. आपणच पालकमंत्री होणार, सगळीकडे कामं करणार... ठीक आहे. प्रत्येकाचं स्वप्न असलं पाहिजे. प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे. त्याही बद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. मात्र, नंतर मी त्याला सांगितलं आता तू मला सोडून गेलाय. आता मी तुला पाडणार. तू कसा निवडून येतो, ते मी पाहणार", असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शिरुरचे माजी आमदार अशोक पवार यांना टोला लगावलाय.
हेही वाचा : महापूरामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं आयुष्य उध्वस्त, मराठी कलाकार मदतीसाठी सरसावले; कोणी केली मदत?
सुनील शेळकेला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला - अजित पवार
अजित पवार म्हणाले, मावळमध्ये सुनील शेळकेला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. आपल्या जवळचे लोकं अपक्ष उभे राहिले. तरीही 1 लाखाच्या मताधिक्याने सुनील शेळके निवडून आला. माझं एकच मत आहे, ज्याच्या बरोबर राहायचं असेल त्याच्यासोबत राहा. मात्र, निष्ठेने राहा. कधी आमच्यासोबत दिसायचं. मध्येच कुठेतरी इतरांबरोबर मीटिंग केल्याचं दाखवायचं. सगळ्यांबद्दल मान सन्मान आहे. दोन-तीन दगडांवर हात ठेवण्याचा प्रयत्न केला तर हाती लागत नसतं. निष्ठेला महत्त्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र लढायचो. गरज पडली तर एकत्र यायचो.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राजकारण करत असताना मी कधी दुजाभाव केला नाही. मी पीडीसीसी बँकेचा संचालक नाही, मात्र आप्पा येथे बसले आहेत. त्यांना नेहमी सांगत असतो शेतकरी डोळ्यासमोर ठेवा. मदत करा. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करु. महाराष्ट्रात 2022 ला निवडणुका झाल्या. त्यानंतर 4 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काम करण्याची संधी मिळायला हवी. तेव्हाच कार्यकर्ता तयार होत असतो. आता कुठल्याही क्षणी त्या निवडणुका जाहीर होतील. आज आपल्या जिल्ह्याला रिंगरोडच्या निमित्ताने ज्या गोष्टी करता येतील, त्या करण्यासाठी मी आणि सहकारी लक्ष घालतोय.