India Today Conclave: 'त्या' ड्रेसवरून झालेली प्रचंड ट्रोलिंग, अमृता फडणवीसांनी आता कोणाला सुनावलं?

मुंबई तक

गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेदरम्यान अमृता फडणवीसांनी जे कपडे परिधान केले होते त्यावरून त्यांना सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. पण आता त्याच ट्रोलर्संना अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

india today conclave mumbai 2025 who did amruta fadnavis tell about massive trolling over that beach dress
Amruta fadnavis
social share
google news

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनारी पार पडलेल्या स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेल्या. त्यावेळेसचे त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ हे व्हायरल झाले होते. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी परिधान केलेल्या कपड्यांवरून त्यांना सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. अनेक यावरून थेट भाजपवर देखील टीका केलेली. अशावेळी याच सगळ्या ट्रोलिंगबाबत अमृता फडणवीस यांनी त्यांचं मत मांडलं आहे. 

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई 2025 मध्ये बोलताना अमृता फडणवीस यांनी त्यांच्या कपड्यांवरून टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. पण त्याचवेळी त्यांनी या सगळ्या प्रकाराबाबत त्यांची स्पष्ट मतं देखील मांडली. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री आणि त्याचे पती देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला.

हे ही वाचा>> India Today Conclave Mumbai: 'तो आमचा अतिआत्मविश्वास होता...', CM फडणवीसांनी 'ती' चूक केली मान्य!

देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पालक हे नेहमीच प्रत्येक व्यक्तीला त्याची स्पेस देतात. त्यामुळे या सगळ्या प्रकाराबाबत घरात कधीच स्पष्टीकरण द्यावं लागत नाही. असंही अमृता फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पाहा कपड्यांवरून झालेल्या ट्रोलिंगबाबत नेमकं काय म्हणाल्या अमृता फडणवीस

'मला वाटतं की काही ठिकाणी सोशल मीडिया हँडल जास्त सक्रिय असतात. बातम्यांपेक्षा, प्रकाशनांपेक्षाही जास्त. हे हँडल जास्त सक्रिय असतात. आणि ते अशा मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतात जे लोकांना मुख्य मुद्द्यांपासून विचलित करतात. उदाहरणार्थ, गेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान मुख्य मुद्दा कोणता होता? गणेश विसर्जनानंतरची स्वच्छता होती आणि समुदाय, स्वयंसेवी संस्था आणि मुले हे सर्वजण शाडू मातीच्या गणपती मूर्तींचा वापर, पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर, पुनर्वापर करण्यायोग्य निर्माल्य.. यासारख्या गोष्टींचा प्रचार करण्यासाठी एकत्र आले होते. पण हे कुप्रसिद्ध सोशल मीडिया हँडल काय प्रचार करतात?'

हे वाचलं का?

    follow whatsapp