'राहुल गांधी त्यांच्या बहिणीला सार्वजनिक ठिकाणी..', भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई तक

Kailash Vijayvargiya on Rahul Gandhi : भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या बहीण-भावाच्या नात्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपचे ज्येष्ठ नेते विजयवर्गीय यांनी बहीण भावाच्या नात्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय

point

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या बहीण भावाच्या नात्यावर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टिप्पणी

Kailash Vijayvargiya on Rahul Gandhi : भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय आणि बहीण भावाच्या पवित्र नात्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. "विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या बहिणीला सार्वजनिक ठिकाणी किस करतात. ही विदेशातील संस्कृती आहे.", असं मंत्री कैलास विजयवर्गीय म्हणाले आहेत. दरम्यान, विजयवर्गीय यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झालीये. विजयवर्गीय यांचा निषेध नोंवदण्यासाठी काँग्रेसकडून आज मोर्चा देखील काढण्यात आलाय. 

हेही वाचा : मुस्कानने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा खून करत निळ्या ड्रममध्ये टाकले, आता तुरुंगातच करते नवरात्रौत्सवाचा उपवास, बदल पाहून सर्वच थक्क झाले

राहुल गांधी स्वत:च्या बहिणीला किस करतात, कैलास विजय वर्गीय यांचं वादग्रस्त वक्तव्य 

कैलास विजयवर्गीय म्हणाले, “आमचे वडील आपल्या माझ्या आत्याच्या गावात किंवा घरात पाणीही पीत नव्हते. ते म्हणायचे की हे माझ्या बहिणीचं गाव आहे. म्हणजे स्वतःच्या बहिणीच्या गावातसुद्धा ते पाणी पित नसत. पण आज आपले लोकसभा विरोधी पक्षनेते असे आहेत की स्वतःच्या तरुण बहिणीला भर चौकात किस करतात. मी तुम्हाला विचारू इच्छितो, तुमच्यापैकी कोणी असा आहे का? ज्याने स्वतःच्या तरुण मुलीला किंवा बहिणीला सार्वजनिक ठिकाणी चुंबन दिलं असेल? हा संस्कारांचा अभाव आहे. ही तर परदेशी संस्कृतीचे संस्कार आहेत. भारत मात्र आपल्या देशाच्या संस्कृती आणि परंपरेच्या आधारावरच चालेल.”

कैलास विजयवर्गीय यांचं वक्तव्य भाजपच्या संस्कृतीचं दर्शन घडवतं - काँग्रेस 

दरम्यान, कैलास विजयवर्गीय यांच्या या वक्तव्याबाबत काँग्रेस नेते नरेश्वर प्रताप सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचं विधान अतिशय निंदनीय आहे. हे विधान भाजपच्या संस्कृतीचं दर्शन घडवतं आणि मातृशक्तीविषयी त्यांच्या विचारसरणीचं प्रतिबिंब दाखवतं. पक्षात त्यांना कोणी ऐकत नाही म्हणून ते फ्रंटलाईनमध्ये येण्यासाठी अशा प्रकारची विधाने करत आहेत. काँग्रेस यावर आंदोलन करणार आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp