बारशाचं आमंत्रण दिलं नसल्याचा राग, सरपंच मॅडमचा पती संतापला; बाळाच्या बापाला गोळ्या घालून संपवलं

मुंबई तक

Crime News : बारशाचं आमंत्रण दिलं नसल्याने सरपंच पती संतापला. त्याने बाळाच्या बापाची गोळ्या घालून हत्या केलीये.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Crime News : गावातील एका बारशाचं आमंत्रण दिल नसल्याचा राग मनात धरुन सरपंच पतीने बाळाच्या बापाला गोळ्या घालून संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील Shahjahanpur मध्ये ही घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडिताच्या नातेवाईकांनी सरपंच मॅडमच्या पतीला पकडून चोप दिलाय. 

हेही वाचा : धाराशिवच्या अपंग शेतकऱ्याच्या डोक्यावर 40 लाखांचं कर्ज, 15 हजार कोंबड्या पूराच्या पाण्यात वाहून गेल्या, उर बडवत टाहो फोडला

अधिकची माहिती अशी की, गावातील अवनीश कुमार यांच्या मुलाच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाचे निमंत्रण सरपंच पती सुखदेव यांना देण्यात आले नव्हते. यामुळे चिडलेल्या सुखदेवने अवनीशवर गोळी झाडल्याचा आरोप आहे. गोळी लागून अवनीशचा मृत्यू झालाय. कुटुंबात आनंदाचे वातावरण क्षणात दु:खात बदलले आणि कुटुंबावर शोककळा पसरली. ही घटना तिलहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहनपूर गावात घडली आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपी सरपंच पतीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, सरपंच पतीच्या या कृत्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी पीडित कुटुंबाच्या वतीने करण्यात आली आहे. 

या घटनेविषयी बोलताना पोलिस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी सांगितले की, “नामकरण सोहळ्याच्या जेवणावळीत सरपंचाच्या पतीला आमंत्रण न दिल्याच्या कारणावरून बाळाच्या वडिलांना गोळी मारण्यात आली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.” दरम्यान, या प्रकरणी आता सरपंच पतीला न्यायालयता हजर करण्यात येणार असून पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp