3 वर्ष उलटूनही शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल कशामुळे प्रलंबित? आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावर धनंजय चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर
Dhananjaya Chandrachud reply Aaditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रत्युत्तर दिलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आदित्य ठाकरेंच्या प्रश्नाला प्रत्युत्तर दिलंय

3 वर्ष उलटूनही शिवसेनेच्या चिन्हाचा निकाल पेंडिग असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते
Dhananjaya Chandrachud reply Aaditya Thackeray : "निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह चुकीच्या पद्धतीने सुरत आणि गुवाहाटीला पळून गेलेल्या व्यक्तीला दिलं. शिवाय, मी सुप्रीम कोर्टाचा आदरा राखून बोलतो की, शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस गेल्या 3 वर्षांपासून पेंडिंग आहे. राजकीय प्रक्रियेचा विचार करता हे देशातील सर्वात मोठी संविधानिक केस आहे. भटक्या कुत्र्यांच्या केससाठी सुमोटो केस दाखल करण्यात आली होती. पण आमच्या खटल्याची सुनावणी होती नाही. ही देशातील मोठी अडचण आहे.", असं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले होते. ते India Today Conclave मध्ये बोलत होते. आता माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांनी याच कार्यक्रमात आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
धनंजय चंद्रचूड काय काय म्हणाले?
आदित्य ठाकरेंच्या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय चंद्रचूड म्हणाले, "मी सुप्रीम कोर्टातून निवृत्त झालो त्यावेळी भटक्या कुत्र्यांची केस अंतरिम टप्प्यावर पोहोचली होती. प्रकरण अंतरिम टप्प्यावर असताना सर्वोच्च न्यायालयाचा कोणताच न्यायाधीश मी हा प्रश्न सोडवणार नाही, असं म्हणू शकत नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या केस अंतिम टप्प्यात पोहोचली होती. त्याला वेळ लागणार होता. आता जवळपास 80 हजार प्रकरणं सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. आम्ही 34 न्यायाधीश आहोत, तरीही वर्षाला 17 हजार प्रकरणांचा निकाल लावतो. आमचे न्यायाधीश क्षमतेपेक्षा जास्त आणि सर्वोत्तम काम करत आहेत. कोणतीही केस घेतली की, कोणीही म्हणतं आमची केस का घेतली नाही? सर्वोच्च न्यायालयाचा आदर करायला हवा."
हेही वाचा : धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा डान्स व्हिडीओ व्हायरल, कैलास पाटील संतापले; काँग्रेसकडून बडतर्फ करण्याची मागणी
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फुट पडली. त्यानंतर दोन्ही पक्ष वेगळे झाले. दरम्यान, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बहाल केलं होतं. मात्र, शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा खटला अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. दरम्यान, हा खटला सुरु असताना लोकसभा आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक देखील पार पडलीये. निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह दिलं होतं. तर शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊन ठाकरे जनतेपर्यंत प्रचारासाठी गेले होते.