रात्री उशीरा रुममध्ये बोलवायचा, हिडन कॅमेरे लावायचा, विकृत अध्यात्मिक गुरु स्वामी चैतन्यानंदची कुंडली समोर
swami chaitanyananda saraswati : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु swami chaitanyananda saraswati कडून 17 मुलींचा विनयभंग
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरुकडून 17 विद्यार्थिनींचा छळ

अश्लील मेसेज पाठवायचा आणि मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श देखील करत होता
Swami Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आणि शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक स्वामी चैतन्यानंद सरस्वती याने तब्बल 17 मुलींचा विनयभंग केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, मुलींनी या विकृत अध्यात्मिक गुरुची पोलखोल केल्यानंतर आता बाबा फरार झालाय. स्वामी चैतन्यानंद सरस्वती या बाबाने हॉस्टेलमध्ये हिडन कॅमेरे लावले होते. शिवाय तो मुलींना अश्लील मेसेज पाठवायचा आणि मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श देखील करत होता. दरम्यान, एखाद्या मुलीने या बोगस बाबाला विरोध केल्यास आश्रमातून हकालपट्टी करण्याची धमकी दिली जात होती. हाच तो चेहरा, जो पुस्तकांच्या माध्यमातून स्वतःला "महान लेखक आणि तत्त्वज्ञ" म्हणून लोकांसमोर सादर करीत होता. पण प्रत्यक्षात तो निष्पाप विद्यार्थिनींचा छळ करत होता. अनेक मुलींना त्याने ज्ञान व सुरक्षिततेचं आश्वासन देऊन आपल्या जाळ्यात अडकवलं.
पीडित मुलींनी कोणते आरोप केले आहेत?
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) विद्यार्थिनींना हा बोगस स्वामी उशिरा रात्री आपल्या खोलीत बोलवत असे. विद्यार्थिनींच्या हॉस्टेलमध्ये "सुरक्षेच्या" या नावाखाली गुप्त कॅमेरे बसवले होते. विद्यार्थिनीला तिच्या इच्छेविरुद्ध रात्री खासगी रूममध्ये बोलावण्याचं दडपण आणलं जात असे. डीनसह काही कर्मचारी विद्यार्थिनींना स्वामीच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडत आणि तक्रार करण्यासाठी गेल्यास आवाज दाबला जात असे. विरोध करणाऱ्यांना निलंबन व हकालपट्टीची धमकी दिली जात असे. विद्यार्थिनींना मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं. विरोध केल्यास शिक्षण आणि करिअर दोन्ही धोक्यात घालण्याची धमकी देण्यात आल्याचं एफआयआरमधून समोर आलंय.
देवाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॅनरबाजीची सांगितली 'ती' आतली गोष्ट, नेमकं काय म्हणाले?
तपास यंत्रणांनी आतापर्यंत 32 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवली आहेत. त्यापैकी 17 जणींनी दंडाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट सांगितलं की बाबा शिवीगाळ करत असे, अश्लील मेसेज पाठवत असे आणि अनुचित कृत्य करण्याचा प्रयत्न करत असे. अनेक विद्यार्थिनींनी सांगितलं की तीन महिला वॉर्डन त्यांना जबरदस्तीने बाबाच्या खोलीत नेत असत. म्हणजेच संपूर्ण व्यवस्था एक कटकारस्थानाप्रमाणे रचली गेली होती, जेणेकरून बाहेर कोणीही आवाज उठवू नये. हा पहिलाच प्रसंग नाही जेव्हा चैतन्यानंद वादात सापडला आहे. 2009 मध्ये डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूक व छेडछाडीचा गुन्हा नोंदवला गेला होता. 2016 मध्ये वसंतकुंज ठाण्यातही छेडछाडीची तक्रार झाली होती. प्रत्येक वेळी त्याने पैसा आणि नेटवर्कच्या जोरावर स्वतःला वाचवले. पण या वेळी विद्यार्थिनींचे जबाब आणि डिजिटल पुराव्यांनी त्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत.
फरार स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचा पोलिसांकडून शोध सुरु
एफआयआर नोंद झाल्यापासूनच चैतन्यानंद फरार आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली आहेत. सर्व विमानतळांवर आणि सीमाक्षेत्रांवर पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याचं शेवटचं लोकेशन आग्रा असल्याचं समोर आलंय. बाबा सतत ठिकाण बदलत आहे आणि मोबाईल वापरणे टाळत आहे, जेणेकरून ट्रॅक होऊ नये.