तरुणाला होतं ड्रग्जचं व्यसन, कुटुंबियांनी व्यसनमुक्ती केंद्रात केलं दाखल, तरुणाच्या पोटातून निघाले 29 स्टीलचे चमचे अन्...

मुंबई तक

Crime News : ड्रग्जच्या व्यसनाने ग्रस्त झालेल्या सचिन नावाच्या तरुणाला त्याच्या कुटुंबियांनी त्याला एका व्यसनमुक्ती केंद्रात टाकलं होतं. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याची शस्त्रक्रिया केली होती आणि पोटातून तब्बल एक दोन नव्हे तर 29 स्टिलचे चमचे बाहेर काढण्यात आले होते.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ड्रग्जच्या व्यसनाने तरुण ग्रस्त

point

कुटुंबियांनी पाठवलं व्यसनमुक्ती केंद्रात

point

नेमकं काय घडलं?

Crime News : माणूस एकदा व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर काहीही सांगता येत नाही. एखाद्या व्यक्तीला आपलं व्यसन पूर्ण करता आलं नाही,तर ती व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते, अशीच एक घटना आता समोर आली आहे. ड्रग्जच्या व्यसनाने ग्रस्त झालेल्या सचिन नावाच्या तरुणाला त्याच्या कुटुंबियांनी त्याला एका व्यसनमुक्ती केंद्रात टाकलं होतं. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याची शस्त्रक्रिया केली होती आणि पोटातून तब्बल एक दोन नव्हे तर 29 स्टिलचे चमचे, टूथब्रश काढले होते. ही घटना उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : माझे पप्पा गेले, कोणाचेही जाऊ नयेत; अतिवृष्टीमुळे शेतकरी बापाचं टोकाचं पाऊल, लेकीनं फोडला हंबरडा

तरुणाला ड्रग्जच्या नशेनं वेढलं

हे प्रकरण बुलंदशहर येथील 40 वर्षीय सचिनशी संबंधित असून त्याला ड्राग्जच्या व्यसनाने वेढलं आहे. त्याच्या या व्यसनाने त्याचे कुटुंबीय त्रस्त झाले होते. त्याला त्याच्या कुटुंबाने बुलंदशहरातील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले. दरम्यान, सचिनने रागाच्या भरात स्टीलचे चमचे आणि टूथब्रश खायला सुरुवात केली. त्याची तब्येतही बिघडल्यानंतर त्याच्या कुटुंबियाने त्याला हापूरमधील एका रुग्णालयात दाखल केले होते.

पोटात 29 स्टीलचे चमचे आणि..

डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली असता, त्याच्या पोटात मोठ्या प्रमाणात काही स्टीलच्या वस्तू आढळल्या. तेव्हा डॉक्टरांच्या पथकाने ऑपरेशन केले आणि सचिनच्या पोटातून 29 स्टीलचे चमचे आणि 19 टूथब्रश आणि दोन धारदार पेन काढले होते.

हे ही वाचा : देवाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॅनरबाजीची सांगितली 'ती' आतली गोष्ट, नेमकं काय म्हणाले?

डॉक्टर श्याम कुमार यांनी स्पष्ट केलं की, मानसिक किंवा मानसिक समस्या असलेल्या लोकांमध्ये या प्रकाराची समस्या अनेकदा दिसून येते. शस्त्रक्रियेनंतर सचिनची प्रकृत स्थिर असल्याचे सांगण्यात येते. तसेच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp