"पतीला पाळीव उंदीर म्हणणं मानसिक क्रूरता..." घटस्फोटाच्या 'त्या' प्रकरणात हायकोर्टाचा धक्कादायक निर्णय...
हायकोर्टाने पती आणि पत्नीच्या वादाशी संबंधित एका घटस्फोटाच्या प्रकरणात धक्कादायक निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. खरंतर, रायपुरमध्ये राहणाऱ्या एका बँक कर्मचाऱ्याचं लायब्रेरिअनसोबत लग्न झालं होतं. कालांतराने त्या दोघांमध्ये सतत वाद सुरू झाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

घटस्फोटाच्या 'त्या' प्रकरणात हायकोर्टाचा निर्णय

"पतीला पाळीव उंदीर म्हणणं मानसिक क्रूरता..."

नेमकं प्रकरण काय?
Court Decision on Divorce Case: छत्तीसगड हायकोर्टाने पती आणि पत्नीच्या वादाशी संबंधित एका घटस्फोटाच्या प्रकरणात धक्कादायक निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. खरंतर, 2009 मध्ये रायपुरमध्ये राहणाऱ्या एका बँक कर्मचाऱ्याचं लायब्रेरिअनसोबत लग्न झालं होतं. लग्नाच्या वर्षभरानंतर त्यांना एक मुलगा झाला, परंतु, कालांतराने त्या दोघांमध्ये सतत वाद सुरू झाले.
2010 मध्ये पत्नी माहेरी गेली अन्...
अचानक, वाद सुरू असताना पत्नीने गर्भपातासाठी सहमती देण्यासाठी भाग पाडलं आणि स्वत:ला जखमी करून घेतल्याचा आरोप पतीने केला. संबंधित महिला नेहमी तिच्या पतीला पाळीव उंदीर म्हणून अपमानित करायची आणि ही बाब मानसिक क्रूरता असल्याचं हायकोर्टाने सांगितलं. सतत वादाला कंटाळून ऑगस्ट 2010 मध्ये पत्नी माहेरी निघून गेली आणि ती परत सासरी परतलीच नसल्याचं पतीने सांगितलं.
पतीचे आरोप खरे असल्याचं समजून ट्रायल कोर्टाने दोघांचा घटस्फोट मंजूर केला होता. उच्च न्यायालयाने सुद्धा पत्नीची क्रूरता आणि पतीने तिच्यावर केलेले पळून जाण्याचे आरोप खरे असल्याचं आढळून आलं आणि यामुळे न्यायालयाने घटस्फोट मंजूर केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, कोर्टाने पत्नीचं अपील फेटाळून लावल्याची देखील माहिती आहे.
हे ही वाचा: दीर आणि वहिनीचे अनैतिक संबंध, पतीचा संपवण्याचा भयानक कट अन् अखेर निर्घृण हत्या! नेमकं प्रकरण काय?
न्यायालयाने काय सांगितलं?
जस्टिस रजनी दुबे आणि जस्टिस अमितेंद्र किशोर प्रसाद यांच्या डिव्हिजन बँचच्या मते, पत्नीने वैवाहिक कर्तव्यांचं पालन केलं नसल्याचं पती आणि त्याच्या कुटुंबियांची साक्ष तसेच पत्नीने दिलेल्या जबाबावरून स्पष्ट होतं. ऑगस्ट 2010 मध्ये पतीपासून वेगळं राहणं हे पलायन ठरत असल्याचं देखील न्यायालयाने सांगितलं.