शाळेच्या एमडीकडून शिक्षिकेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श, PA नेही केला विनयभंग, शिक्षिका नैराश्यात; संतापजनक घटना
Teacher sexual harassment case : शाळेच्या एमडीने एका शिक्षिकेसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शाळेच्या एमडीने शिक्षिकेसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय

एमडीसोबतच त्याच्या पीएने देखील शिक्षिकेचा विनयभंग केलाय
Teacher sexual harassment case : शाळेच्या मॅनेजिंग डायरेक्टरने शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. "एमडी आणि त्याच्या पीएने मला केबिनमध्ये बोलावलं होतं. मला म्हणाले, "आज तुला मला खुश करावं लागेल. त्यांनी मला पकडलं, माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला. मी जोरात ओरडले त्यांना ढकलून देऊन पळू आले", असं पीडित शिक्षिकेने सांगितलंय. दरम्यान, या प्रकरणी गुरुग्रामच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात शाळेच्या एमडी आणि त्याच्या पीएविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
होम सायन्स ऐवजी FMM विषय शिकवण्याचा दबाव आणला, नकार दिल्याने त्रास देण्यास सुरुवात
पीडित शिक्षिका मूळची हरियाण्यातील गुरुग्राम जिल्ह्यातील आहे. शिक्षिकेने 19 जानेवारी 2025 रोजी तिने 32,500 रुपये पगारावर शाळेत नोकरी स्वीकारली होती. आपल्या मोठ्या मुलीच्या शिक्षणासाठी देखील हीच शाळा निवडली होती. शाळा प्रशासनाने तिला आणि तिच्या दोन्ही मुलींना मुलांच्या वसतिगृहाच्या ग्राउंड फ्लोरवर एक रुम उपलब्ध करुन देण्यात आली होती. दरम्यान, शाळेचे एमडी लव मोहन यांनी तिला होम सायन्स ऐवजी FMM विषय शिकवण्याचा दबाव आणला. तिने नकार दिल्यावर तिला त्रास द्यायला सुरुवात झाली.
या प्रकरणी बोलताना पोलीस इन्स्पेक्टर देवेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एफआयआर मैनपुरीच्या दन्नाहार पोलीस ठाण्यात पाठवली आहे. पुढील कारवाई मैनपुरी पोलीस करतील. मात्र मैनपुरीचे एसपी सिटी संतोष कुमार सिंह यांनी सांगितले – अजून FIR मिळालेली नाही. मला प्रत मिळाल्यावर चौकशी करून कारवाई केली जाईल.