Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला त्याचे वैयक्तिक अनुभव जाहीरपणे सांगायला फारसं आवडत नाही. तो त्याच्या मुलांना देखील प्रसिद्धीपासून दूर ठेवताना पाहायला मिळतो. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्याबरोबर त्यांचं मुलं कार्यक्रमांमध्ये फारसे पाहायला मिळत नाहीत. अक्षय कुमार त्याची मुलगी नितारा हिची विशेष काळजी घेताना पाहायला मिळतो. तो पापाराझींपासून देखील मुलीला दूर ठेवतो. दरम्यान, अक्षय कुमारच्या मुलीला काही लोकांनी अश्लील मेसेज पाठवले आहेत, याबाबतचा खुलासा स्वत: अक्षय कुमारने केला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : दारु पिऊन एसटी चालवली म्हणून गुन्हा दाखल झाला, अन् चालकाने बसमध्येच गळफास घेतला; आहिल्यानगरमधील घटना
अक्षय कुमार म्हणाला , “काही महिन्यांपूर्वी माझी मुलगी एक व्हिडिओ गेम खेळत होती. काही गेम असे असतात ज्यात तुम्ही इतर अनोळखी लोकांसोबत खेळू शकता. खेळताना तिथून मेसेज येत होते – थँक यू, ओह दॅट वॉज ग्रेट, यू आर डुइंग सो ग्रेट, टू गुड, फँटॅस्टिक – म्हणजे खूपच सौजन्यपूर्ण मेसेजेस येत होते.”
तुझे न्यूड फोटो पाठवशील का?
पुढे बोलताना अक्षय म्हणाला, “अचानक त्या व्यक्तीने विचारलं, तू कुठून आहेस? मुलीने उत्तर दिलं – मुंबई. त्यानंतर पुन्हा सर्व काही सामान्यच सुरू होतं. वेल प्लेड, खूप छान केलं, थँक यू असे मेसेजेस येत होते. त्यामुळे असं वाटलं की हा खूप सभ्य माणूस असेल. जो कुणी समोर खेळत होता त्याला ओळखतही नव्हते. यानंतर अचानक मेसेज आला – तू मेल आहेस की फीमेल? मुलीने उत्तर दिलं – फीमेल. मग थोडा संवाद चालू होता. पण अचानक त्या अनोळखी व्यक्तीने मेसेज केला – तू मला तुझे न्यूड फोटो पाठवशील का? ते पाहताच माझ्या मुलीने तात्काळ गेम बंद केला आणि लगेच आईला ही गोष्ट सांगितली. ही चांगली बाब होती की तिने विलंब न करता आईला सगळं सांगितलं.”
अशा पद्धतीने गोष्टी सुरू होतात. हे सायबर क्राईमचं एक रूप आहे. इथे मुलांना फसवलं जातं, नंतर पैशासाठी ब्लॅकमेल (एक्स्टॉर्शन) केलं जातं. त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडतात आणि काही प्रकरणांत तर लोकांनी आत्महत्याही केल्याच्या घटना आहेत, असं अक्षय कुमारने सांगितलं. अक्षय कुमारने यावेळी पालकांना सतर्क राहाण्याचा सल्ला दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आमच्या काळजाचा विषय, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याच्या WhatsApp स्टेटसला वाल्मिक कराडचे फोटो
ADVERTISEMENT
