वामिकाच्या जन्मानंतर पुन्हा सेटवर परतली अनुष्का शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा कामावर परतली आहे. अनुष्काने जानेवारी महिन्यात बाळाला जन्म दिला होता. अनुष्काने बाळाचं नाव ‘वामिका’ असं ठेवलंय. तर आता वामिकाच्या जन्मानंतर तब्बल 2 महिन्यांनी अनुष्का पुन्हा सेटवर परतली आहे. नुकतंच अनुष्काला एका शूटदरम्यान स्पॉट करण्यात आलं. अनुष्का तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी मे महिन्यापासून सुरुवात करणार असल्याची चर्चा होती. मात्र अनुष्का महिन्याभरापूर्वीच […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:51 AM • 31 Mar 2021

follow google news

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा कामावर परतली आहे. अनुष्काने जानेवारी महिन्यात बाळाला जन्म दिला होता. अनुष्काने बाळाचं नाव ‘वामिका’ असं ठेवलंय. तर आता वामिकाच्या जन्मानंतर तब्बल 2 महिन्यांनी अनुष्का पुन्हा सेटवर परतली आहे. नुकतंच अनुष्काला एका शूटदरम्यान स्पॉट करण्यात आलं.

हे वाचलं का?

अनुष्का तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी मे महिन्यापासून सुरुवात करणार असल्याची चर्चा होती. मात्र अनुष्का महिन्याभरापूर्वीच कामासाठी सज्ज झाली आहे. दोन महिन्यांनंतर एका जाहिरातीच्या शूटींगसाठी अनुष्का शर्मा सेटवर दिसली. येत्या दोन किंवा तीन दिवसांमध्ये ती जाहिरातीचं शूट पूर्ण करणार आहे. त्यानंतर अनुष्का सिनेमाच्या शूटींगलाही सुरुवात करण्याची शक्यता आहे.

वामिकाच्या जन्मानंतरचे अनुष्काचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. तर आता तिचे कामावर परतल्याचे फोटो सोशल मीडियावर पाहून फॅन्स खूप उत्सुक झाले आहेत. अनुष्का शर्माचा फिटनेस पाहता अनेकांनी तिचं कौतुकंही केलंय.

चिमुकली वामिका आईच्या कुशीत आणि बाबाच्या हातात बॅगा; वामिकासह विरूष्का एअरपोर्टवर स्पॉट

झिरो या सिनेमामध्ये अनुष्का शर्मा दिसली होती. त्यानंतर तिने कोणताही सिनेमा केला नाही. झिरो सिनेमानंतर अनुष्काने नव्या सिनेमाची माहितीही दिली नाही. दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी हिच्या बायोपिकमध्येही अनुष्का झळकण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

    follow whatsapp