Arbaaz Khan and Sshura Khan welcome baby girl : अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांच्या घरात बाळाचे आगमन झाले आहे. अरबाज वयाच्या 58 व्या वर्षी बाप झालाय तर अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा काका झालाय. अरबाजची पत्नी शूरा हिने गुरुवारी (दि.4) ऑक्टोबर रोजी मुंबईतील पी. डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शूराने रविवारी 5 ऑक्टोबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. या आनंदात सहभागी होण्यासाठी सलमान खानसुद्धा आपल्या कुटुंबासह पनवेल येथील फार्महाऊसमधून परत येत आहेत.
ADVERTISEMENT
अरबाज आणि शूराची प्रेमकहाणी
अरबाज खान आणि शूरा खान यांची प्रेमकहाणी ही बॉलिवूडच्या पडद्यामागे फुललेली एक गोड लवस्टोरी आहे. दोघांची पहिली भेट रवीना टंडनच्या ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्या वेळी अरबाज या चित्रपटाचे निर्माता होते, तर शूरा मुख्य अभिनेत्रीची मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होत्या. सेटवर सुरू झालेले व्यावसायिक नाते हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलले. काही काळ डेट केल्यानंतर, 24 डिसेंबर 2023 रोजी दोघांनी अरबाजची बहीण अर्पिता खान शर्मा यांच्या निवासस्थानी एका खास निकाह सोहळ्यात लग्न केले.
हेही वाचा : शरद पवारांच्या आमदाराला मारहाण झाल्याची चर्चा, अखेर बापूसाहेब पठारे समोर; काय घडलं? सगळं सांगितलं
अरबाजचे दुसरे अपत्य
अरबाज खान खानचे हे दुसरे अपत्य आहे. अरबाज खानने अभिनेत्री मलायका अरोरा हिच्याशी पहिला विवाह केला होता. त्यानंतर त्यांना पहिला मुलगा झाला होता. त्याचं नाव अरहान खान असं आहे. मलायका आणि अरबाज यांचे लग्न 1998 मध्ये झाले होते, मात्र 19 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
अरबाज आणि शूरा या दोघांच्या वयात तब्बल 22 वर्षांचा फरक आहे. अभिनेता अरबाज खान सध्या 57 वर्षांचे आहेत, तर शूरा खान 35 वर्षांच्या आहेत. दोघांनी डिसेंबर 2023 मध्ये लग्न केले होते आणि आता ते आई-वडील झाले आहेत. तिसरी लग्नाचा वाढदिवस साजरी होण्यापूर्वीच त्यांच्या कुटुंबात बाळाचे आगमन झाले आहे.
हेही वाचा : शरद पवारांच्या आमदाराला मारहाण झाल्याची चर्चा, अखेर बापूसाहेब पठारे समोर; काय घडलं? सगळं सांगितलं
ADVERTISEMENT
