“मला चिकन लॉलीपॉप दे...” मुलाचा हट्ट अन् आई संतापली, थेट घेतला चिमुकल्याचा जीव

एका महिलेने तिच्या दोन मुलांनी चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट केल्यामुळे त्यांना काठीने मारहाण केली. या मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुलाचा हट्ट अन् संतापलेल्या आईने केली बेदम मारहाण

मुलाचा हट्ट अन् संतापलेल्या आईने केली बेदम मारहाण

मुंबई तक

• 05:33 AM • 06 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंलांनी चिकन लॉलीपॉपचा धरला हट्ट

point

संतापलेल्या आईने केली बेदम मारहाण

point

पालघरमध्ये चिमुकल्याचा मृत्यू!

Mumbai Crime: मुंबईमधील पालघरमध्ये एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे, एका महिलेने तिच्या दोन मुलांनी चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट केल्यामुळे त्यांना काठीने मारहाण केली. या मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघरच्या काशीपाडा परिसरात ही दुर्दैवी घटना घडल्याचं वृत्त आहे. यामध्ये मृत पावलेला मुलगा सात वर्षांचा असून त्याचं नाव चिन्मय धुमडे असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी आता आरोपी आईला अटक केल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट 

संबंधित घटना पालघर येथील सतपती रोडवरील काशीपाडाच्या घोडेला कॉम्प्लेक्समधील शाम रीजेन्सी नावाच्या एका बिल्डिंगमध्ये घडली. येथे, पल्लवी धुमडे (40) नावाची एक महिला तिचा मुलगा चिन्मय (7) आणि मुलगी लव्या (10) यांच्यासोबत तिच्या बहिणीच्या घरी राहते. काही महिन्यांपूर्वी, ती तिच्या पतीसोबत वाद झाल्यामुळे भाईंदरहून पालघर शहराजवळील काशीपाडा येथे राहायला आली. एके दिवशी, चिन्मय आणि लव्याने आपल्या आईकडे चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट धरला. त्यावेळी, नवरात्र सुरू झाल्यामुळे ती उपवास करत आहे आणि त्यांना चिकन लॉलीपॉप मिळणार नसल्याचं आईने मुलांना सांगितलं.

हे ही वाचा: मुंबईची खबर: बेकायदेशीर घरांचं पुनर्वसन नाही? मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

संतापलेल्या आईने केली बेदम मारहाण  

परंतु, मुलांनी चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट सोडला नाही. पल्लवी यावर प्रचंड संतापली आणि तिने दोन्ही मुलांना काठीने मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाणीदरम्यान, चिन्मयच्या डोक्यावर काठीचा जोरात मार लागला, ज्यामुळे तो गंभीर पद्धतीने जखमी झाला. त्यानंतर, त्याला उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे उपचारादरम्यान सात वर्षीय चिन्मयचा दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित घटना शुक्रवारी रात्री (26 सप्टेंबर) घडली. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा: Govt Job: रेल्वेमध्ये 2570 पदांसाठी बंपर भरती! ‘या’ पदांसाठी लवकरात लवकर करा अर्ज... काय आहे पात्रता?

आईविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल  

आपल्या मुलाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करणाऱ्या आरोपी पल्लवी धुमडेविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आईला अटक करण्यात आली असून पालघर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    follow whatsapp