मुंबईची खबर: आता मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मिळणार सुटका! 'या' महामार्गाबाबत मोठा निर्णय...

मुंबईत ट्रॅफिक कमी करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने शीव-पनवेल महामार्गावरील शीव पुलाच्या विस्तारासाठी मंजूरी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

आता मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मिळणार सुटका!

आता मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मिळणार सुटका!

मुंबई तक

• 06:40 PM • 05 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आता मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मिळणार सुटका!

point

'या' महामार्गाबाबत मोठा निर्णय...

Mumbai News: मुंबईत ट्रॅफिक कमी करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने शीव-पनवेल महामार्गावरील शीव पुलाच्या विस्तारासाठी मंजूरी देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पूर्वी हा पुल उपनगरांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असून ट्रॅफिक पोलिसांकडून या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत सध्याच्या पुलासोबत दोन नव्या समांतर लेन बनवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

मुंबईकरांना मिळणार दिलासा 

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, प्रस्तावित योजनेसाठी मातीच्या तपासणीचं काम सुद्ध सुरू करण्यात आलं असून या योजनेमुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

खरंतर, शीव-पनवेल महामार्ग हा मुंबईच्या पूर्व उपनगरांचा मुख्य मार्ग असल्याची माहिती आहे. या मार्गावर दररोज लाखो वाहनं धावतात. सध्या, या हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने बऱ्याच काळापासून शीव पुलाच्या विस्ताराची मागणी केली जात होती. 2002 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर हा पूल बनवण्यात आला होता.

सध्याच्या शीव पुलावर आता तीन लेन असून यातील दोन लेनचा ठाणे आणि ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी वापर होतो आणि उर्वरित एका लेनचा दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी उपयोग होतो. मागील बऱ्याच वर्षांपासून या मार्गावर धावणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाहायला मिळतं. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे हा फ्लायओव्हर लहान पडत असून यामुळे प्रवाशांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

हे ही वाचा: पाझर तलावात पोहण्यासाठी गेला, पण पाण्याचा अंदाज न आल्याने 12 वर्षीय तरुण बुडाला; जालन्यातील दुर्दैवी घटना

राहुल शेवाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली

या महत्त्वाच्या प्रकल्पाला पुढे नेण्यात शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी तत्कालीन मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना यासंदर्भात पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी शीव पुलाचा त्वरित विस्तार करण्याची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांनंतर, प्रस्ताव वेगाने पुढे सरकला आणि वाहतूक विभागाने मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. यामुळे एक मोठा अडथळा दूर झाला आहे.

हे ही वाचा: Govt Job: भारत सरकारच्या 'या' कंपनीत निघाली मोठी भरती! पगार ऐकून तर थक्कच व्हाल... कसं कराल अप्लाय?

मुंबई महानगरपालिकेचा संबंधित विभाग लवकरच या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल तयार करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या अहवालात आराखडा आणि खर्चाची सविस्तर माहिती असेल. हा अहवाल पूर्ण झाल्यानंतर, पुलाच्या विस्ताराचा मार्ग पूर्णपणे मोकळा होणार आहे. या विस्तारामुळे मुंबईतील लोकांना मोठा दिलासा मिळणार असून शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या निर्णयामुळे नागरिकांचा प्रवास सोपा आणि जलद होणार असल्याची माहिती आहे. 

​​​​​​​

    follow whatsapp