Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने (IMD) महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, आज (6 ऑक्टोबर 2025) रोजी राज्यातील हवामान नेमकं कसं असेल, याबाबत आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयातय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : दोन मुली इमारतीत खेळत असताना इस्टेट एजंट करू लागला अश्लील चाळे, धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद
कोकण :
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मध्यम पावसाचा अंदाज जारी केला आहे. यापैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी धुळे, नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यात पावसासह वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच इतर काही जिल्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात हलक्या पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर, दोन्ही भावांमध्ये नेमकी चर्चा काय?
विदर्भ :
विदर्भातील अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांपैकी वाशिम, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कसलाही अंदाज जारी केला नाही. तसेच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत हवामान विभागाने विजेसह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
ADVERTISEMENT
