Rashmika Mandanna and Vijay Deverakonda got engaged : बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये छाप सोडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे ग्लॅमरच्या जगतात सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक आहेत. दोघांनी त्यांचं नातं अधिकृत केलं नसलं, तरी त्यांचं प्रेम कुणापासूनही लपून राहत नाही. कधी ते एखाद्या कार्यक्रमाला एकत्र दिसतात, तर कधी सुट्टीवर जातात. अनेकदा रश्मिका विजयची टी-शर्ट किंवा कॅप घातलेलीही दिसली आहे. दरम्यान, आता अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी डेटिंगच्या अफवांनंतरही त्यांचं नातं कधीच सार्वजनिकपणे मान्य केलं नाही. पण त्यांच्या चाहत्यांना ते लग्नबंधनात अडकलेले पाहण्याची नेहमीच आतुरता होती. अखेर तो क्षण आलाच आहे. होय, रश्मिका आणि विजय लवकरच विवाहबंधनात अडकू शकतात.
हेही वाचा : निलेश घायवळची धाराशिवच्या व्यापाऱ्याला धमकी? जुनी ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल
रश्मिका-विजयची साखरपुडा
मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे. कुठलाही गाजावाजा न करता या जोडप्याने आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाच्या उपस्थितीत खासगी समारंभात एकमेकांना आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन देत लग्नाचा निर्णय घेतलाय.
रश्मिका-विजयच्या लग्नाची तारीख
इतकंच नव्हे, तर रश्मिका आणि विजयच्या लग्नाची तारीखही ठरली आहे. पाच महिन्यांनंतर म्हणजेच पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हे दोघं पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकतील. सोशल मीडियावर त्यांच्या गुपचूप साखरपुड्याबद्दल चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र, अद्याप या जोडप्याकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
रश्मिका-विजयची लव्ह स्टोरी
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लवस्टोरीची सुरुवात चित्रपटाच्या सेटवरून झाली. दोघं पहिल्यांदा 2018 मध्ये गीता गोविंदम या चित्रपटात एकत्र दिसले होते आणि त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली होती. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी डियर कॉमरेड या चित्रपटात काम केलं. या दोन चित्रपटांनंतरच रश्मिका आणि विजय डेट करत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सातारा : काकाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं, गरोदर असल्याचं समजताच कोयना धरणाच्या किनारी...
ADVERTISEMENT
