Video: हृतिक रोशन आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन हातात हात घालून पार्टीत पोहचला ..आणि

अभिनेता हृतिक रोशन त्याच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. सुझान खानबरोबर अनेक वर्ष संसार केल्यानंतर दोघंही विभक्त झाले. पण आपल्या मुलांसाठी हे दोघं अजूनही एकत्र येतात. रिलेशनशिपमुळे बी-टाऊनमध्ये चर्चेत असणारा हृतिक आता अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. यापूर्वी हृतिक-सबाला बऱ्याचदा एकत्र पाहण्यात आलं होतं. दोघांचे फोटो, व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. आता […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:26 PM • 26 May 2022

follow google news

अभिनेता हृतिक रोशन त्याच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. सुझान खानबरोबर अनेक वर्ष संसार केल्यानंतर दोघंही विभक्त झाले. पण आपल्या मुलांसाठी हे दोघं अजूनही एकत्र येतात. रिलेशनशिपमुळे बी-टाऊनमध्ये चर्चेत असणारा हृतिक आता अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. यापूर्वी हृतिक-सबाला बऱ्याचदा एकत्र पाहण्यात आलं होतं. दोघांचे फोटो, व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. आता तर चक्क हृतिक सबाला घेऊन दिग्दर्शक करण जोहरच्या बर्थ पार्टीला पोहोचला होता.

हे वाचलं का?

करणने आपला ५०वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. यावेळी बी-टाऊनमधील सगळीच मंडळी उपस्थित होती. तसेच हृतिक देखील करणला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला. पण यावेळी तो एकटा नव्हता. हृतिक आणि सबा दोघंही यावेळी करणच्या बर्थडे पार्टीला एकत्र आले होते. हातात हात घालून हृतिक-सबा चालत येत असताना उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या. त्यांचा यादरम्यानचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हृतिक-सबाने कॅमेऱ्यासमोर फोटोसाठी विविध पोझ देखील दिल्या. यावेळी दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. आता तर या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पार्टीला हृतिकची एक्स पत्नी सुझान खान देखील हजर होती. सुझानने देखील आपल्या प्रियकराबरोबर या पार्टीला येणं पसंत केलं. म्हणजेच हृतिक-सुझानने आपापला जोडीदार निवडला आहे असं म्हणायला हरकत नाही.

    follow whatsapp