अल्पवयीन मुलीवर मित्रांसोबत सामूहिक बलात्कार, रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं?

मुंबई तक

15 Sep 2026 (अपडेटेड: 15 Sep 2026, 12:01 PM)

झारखंडमधील एका अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार करण्यात आला. रेल्वेमध्ये तिला मारहाण झाल्यानंतर हे भयंकर प्रकरण उघडकीस आले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

रेल्वेत नेमकं काय घडलं?

point

अल्पवयीन मुलीवर मित्रांसोबत सामूहिक बलात्कार

point

वेगवेगळ्या ठिकाणी नेत अत्याचार

Crime News : एका अल्पवयीन मुलीला मारहाण झाल्याच्या घटनेतून एका गंभीर गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. मारहाणीच्या माहितीनंतर रेल्वे सुरक्षा फोर्सने (RPF) आणि जीआरपीच्या पथकाने मुलीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपी पिकलू प्रधान याला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. झारखंडमधील चक्रधरपुर रेल्वे स्टेशनच्या परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

विविध ठिकाणी सामूहिक बलात्कार

पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार, एका विवाहित तरुणाने तिला विश्वासात घेऊन सोबत नेले होते. त्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पिक्लू प्रधान आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी तिला सुमारे महिनाभर गुजरातमध्ये ठेवले होते आणि त्यानंतर एका विटांच्या भट्टीवरही तिच्यावर अत्याचार करण्यात आले. सोमवारी (14 सप्टेंबर) आरोपीने तिला चक्रधरपुर स्टेशनवर सोडून दिले होते, मात्र तो पुन्हा तिथे आल्यावर काही तरुणांनी मुलीला मारहाण केली आणि ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आली.

हे ही वाचा : मनोज जरांगे पाटील प्रचंड संतापले, एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका

मुख्य आरोपीला अटक

चौकशीदरम्यान अत्यंत घाबरलेल्या स्थितीत असलेल्या या मुलीने ती अनेक दिवसांपासून भुकेली असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून RPF आणि GRP च्या अधिकाऱ्यांनी आधी तिला अन्न पुरवले आणि त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिला चक्रधरपुर महिला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी मुख्य आरोपी पिक्लू प्रधान याला अटक करून त्याची कसून चौकशी सुरू केली असून, घटनेत सहभागी असलेल्या इतर सहकाऱ्यांचा आणि ठिकाणांचा शोध घेतला जात आहे.

हे ही वाचा : वेदर रिपोर्ट : परतीच्या पावसाबद्दल काय म्हणालं हवामान खातं?

गुजरातला कसे गेले?

या धक्कादायक घटनेमुळे रेल्वे स्टेशन परिसरातील सुरक्षेचा आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे तिला गुजरातला कसे नेले गेले आणि या गुन्ह्यात आणखी किती लोकांचा सहभाग आहे, या सर्व पैलूंचा पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत.