कंगना राणौतची ‘कू’ अॅपवर अखेर एन्ट्री

विविध मुद्द्यावरून ट्विटरद्वारे टोमणे लगावणारी कंगना राणौत सतत चर्चेत असतेच. तर आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे कंगनाने कू या मायक्रो ब्लॉगिंग अॅपवर एन्ट्री घेतलीये. त्यामुळे आता ट्विटर ऐवजी कंगना आता कू अॅपवरून तिची प्रखर मतं व्यक्त करताना दिसू शकते. कू अॅप जॉईन केल्याची माहिती कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंट […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:41 AM • 16 Feb 2021

follow google news

विविध मुद्द्यावरून ट्विटरद्वारे टोमणे लगावणारी कंगना राणौत सतत चर्चेत असतेच. तर आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे कंगनाने कू या मायक्रो ब्लॉगिंग अॅपवर एन्ट्री घेतलीये. त्यामुळे आता ट्विटर ऐवजी कंगना आता कू अॅपवरून तिची प्रखर मतं व्यक्त करताना दिसू शकते.

हे वाचलं का?

कू अॅप जॉईन केल्याची माहिती कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंट वरून दिली आहे. तर कू अॅपच्या बायोमध्ये कंगनाने स्वतःला खरी देशभक्त आणि हॉट ब्लडेड क्षत्रिय महिला असं म्हटलंय. इतकंच नव्हे तर भाड्याचं घर हे भाड्याचंच असतं अशी अप्रत्यक्षपणे ट्विटरवर टीकाही केली.

कू अॅप जॉईन करतान कंगनाने एक पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगणा म्हणते, “सर्वांना हॅलो…सध्या मी रात्री काम करतेय आणि धाकड या क्रूचा लंच ब्रेक सुरु आहे. तेव्हा कू का करू नये? सध्या ही माझ्यासाठी नवीन जागा आहे आणि इथल्या सर्व गोष्टी समजण्यास मला थोडा वेळ लागेल. पण शेवटी भाड्याचं घर हे भाड्याचं असतं आणि आपलं घर हे आपलचं असतं.”

कंगनाने कू अॅपवर एन्ट्री घेताच तिच्या फॉलोवर्समध्ये झपाट्याने वाढ होताना दिसतंय. काही दिवसांपूर्वीच कंगनाने आपण ट्विटर सोडणार असल्याचे संकेत दिले होते. “ट्विटर आता तुमची वेळ संपली आहे. ट्विटरवरून आता कू अॅपवर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. लवकरच मी माझ्या अकाऊंट्सचे डिटेल्स शेअर करेन,” असं ट्विट कंगनाने केलं होतं.

ट्विटरचे सीईओ जैक डौर्सी यांच्यावर देखील कंगनाने निशाणा साधला होता. तुम्हाला कोणी चीफ जस्टिस बनवलंय? तुम्ही आहात तरी कोण? तसंच काही ड्रगीज आपल्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका कंगनाने जैक डोर्सी यांच्यावर केलेली. यानंतर वादानंतर कंगनाने थेट कू अॅपवर अकाऊंट सुरु केलंय. त्यामुळे आता कंगना ट्विटरला कायमचा रामराम करणार का हा प्रश्न सर्वांसमोर आहे.

    follow whatsapp