‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार 'ही' ज्येष्ठ अभिनेत्री

मुंबई तक

11 Aug 2026 (अपडेटेड: 11 Aug 2026, 01:06 PM)

Kon honaar crorepati : ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेत्री माधुरी दीक्षित करणार आहेत. माधुरी दीक्षित यांच्या आगमनामुळे कार्यक्रमात नवा दृष्टीकोन आणि नवी ऊर्जा पाहायला मिळणार आहे.

Kon honaar crorepati

Kon honaar crorepati

Google CTA

बातम्या हायलाइट

point

‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार 'ही' ज्येष्ठ अभिनेत्री

point

नव्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेत्री माधुरी दीक्षित करणार आहेत

Kon honaar crorepati : मराठी मनोरंजनविश्वात ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची सुरुवात होणार असून या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेत्री माधुरी दीक्षित करणार आहेत. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV यांनी या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राची लाडकी लेक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या आगमनामुळे कार्यक्रमात नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. नव्या विचारांचा, नव्या ऊर्जेचा आणि नव्या स्वप्नांचा प्रवास या पर्वातून सुरू होणार असून ‘आता खेळ बदलणार’ अशी घोषणा करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : हा ग्राऊंड रिपोर्ट डोळे उघडून बघायलाच हवा, इन्फ्रामॅन कुठे आहेत?

माधुरी दीक्षित सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार

महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेल्या या प्रतिष्ठित मंचावर माधुरी दीक्षित सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत त्या ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची सूत्रं हाती घेणार आहेत. ज्ञानाच्या बळावर स्वप्नांना नवी दिशा देणारा आणि सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाला व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम यंदाही प्रेरणादायी ठरणार अशी आशा सर्वांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा : ठाकरे पुन्हा कोर्टात, सिब्बलांच्या नव्या युक्तिवादाने फुटीर खासदारांवर गंडांतर?

माधुरी दीक्षित यांची नव्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया 

माधुरी दीक्षित यांच्या येण्यामुळे ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वात नवा दृष्टीकोन, नवी ऊर्जा अनुभवायला मिळणार आहे. या नव्या प्रवासाविषयी बोलताना माधुरी दीक्षित यांनी ‘कोण होणार करोडपती’ हा केवळ एक कार्यक्रम नसून महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांच्या आशांचा, स्वप्नांचा आणि ज्ञानावरच्या विश्वासाचा उत्सव असल्याचे म्हटले आहे. अशा प्रतिष्ठित मंचाचा भाग होण्याची संधी मिळणे हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. या मंचावर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि स्वप्नांचा प्रवास जवळून अनुभवण्याची संधी मिळत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

‘कोण होणार करोडपती’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. ज्ञानाच्या बळावर सामान्य माणूस आपली असामान्य स्वप्नं कशी पूर्ण करू शकतो, याचा प्रेरणादायी प्रवास या कार्यक्रमातून पाहायला मिळतो. जिद्द, चिकाटी आणि एका संधीमुळे आयुष्य बदलू शकतं, या विश्वासाचा हा कार्यक्रम आहे. ‘कोण होणार करोडपती’चे नवे पर्व लवकरच फक्त सोनी मराठी आणि Sony LIV वर पाहता येणार आहे.