बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याचे सिनेमे तसंच खाजगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. तर रणबीर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आणि रणबीरचं चर्चेत येण्याचं कारण आहे ते म्हणजे त्याची कार…
ADVERTISEMENT
शनिवारी अभिनेता रणबीर कपूरची कार मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली होती. तर एका वेवसाईटने दिलेल्या बातमीनुसार, रणबीरने नो पार्किंग झोनमध्ये त्याची गाडी पार्क केली होती. गाडी नो पार्किंगमध्ये लावल्याने मुंबई पोलिसांनी कारवाई केली. रणबीरच्या गाडीचे टायर लॉक करत गाडी ताब्यात घेतली.
दरम्यान मंगळवारी रणबीर कपूरचे काका राजीव कपूर यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. राजीव कपूर यांच्या निधनानंतर शुक्रवारी कुटुंबियांनी राजीव कपूर यांची प्रेअर मीट ठेवली होती. यावेळी अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
तर दुसरीकडे रणबीर कपूर अयान मुखर्जींच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, नागार्जुन तसंच डिंपल कपाडिया हे देखील भूमिका साकारणात आहेत. तर रणबीरचा अनिमल सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
ADVERTISEMENT
