Raj-Uddhav Thackeray: मराठी माणसांच्या मनातला 'तो' क्षण, राज-उद्धव यांची युती जाहीर!

संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत खास आणि तितकाच महत्त्वाचा असणार आहे. शिवसेना (UBT)पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)पक्षाचे प्रमुख राज ठाकरे आज दुपारी 12 वाजता वरळी येथील ब्लू सी बँक्वेट येथे त्यांच्या युतीची घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दोन्ही ठाकरे बंधूंची आज होणार युती!

दोन्ही ठाकरे बंधूंची आज युती!

मुंबई तक

24 Dec 2025 (अपडेटेड: 24 Dec 2025, 01:36 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अखेर दोन्ही ठाकरे बंधूंची आज होणार युती!

point

काही क्षणांतच ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा

Raj-Uddhav Thackeray: राज्यातील 29 महापालिका निवडणूका जाहीर झाल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच, राजकारणातील एक नवं पर्व म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंचं एकत्र येणं तसेच त्यांच्या राजकीय पक्षांची युती. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत खास आणि तितकाच महत्त्वाचा ठरला आहे. शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाचे प्रमुख राज ठाकरे आज दुपारी वरळी येथील ब्लू सी बँक्वेट येथे त्यांच्या युतीची घोषणा केली आहे.

हे वाचलं का?

ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेची जय्यत तयारी 

ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेसाठी वरळीच्या हॉटेल ब्लू सीमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि बाळासाहेबांच्या फोटोसह दोन्ही पक्षांची चिन्हं पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. तसेच, वरळीत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून पुढं युतीच्या घोषणेसाठी निघाले आणि अखेर ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली. 

हे ही वाचा: आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी... 'उद्या 12 वाजता...' संजय राऊतांनी दिली अवघ्या महाराष्ट्राला ब्रेकिंग न्यूज!

खासदार संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया 

आज दुपारी ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली मुंबईमध्ये या मोठ्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. यासंदर्भात ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, "उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 11.30 वाजता हे शिवतीर्थावर एकत्र येणार असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद घेऊन आणि त्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्राच्या एका ऐतिहासिक पर्वाची ते सुरुवात करणार आहेत. आजचा दिवस यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे. 12 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत राजकीय युतीची घोषणा होणार आहे."

जागावाटप सुद्धा निश्चित... 

ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष असून मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवलीसह 7 महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 227 जागांच्या मुंबई महानगरपालिकेत मनसे 65 ते 70 जागांवर निवडणूक लढवण्याची अपेक्षा आहे, तसेच शिवसेना (यूबीटी) 145 ते 150 जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याची शक्यता आहे. 

    follow whatsapp