Mia Khalifa : जगातील असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे वेगवेगळ्या गोष्टी करत असतात आणि ते पुन्हा पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. ती त्यांची झालेली प्रसिद्धीही त्यांना मोठी कमाई करून देत असते. अशीच एक सेलिब्रिटी आहे, जी अनेक काळापासून पॉर्न इंडस्ट्रीत (porn industry) तिच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते ती म्हणजे मिया खलिफा. मियाने आता जरी पॉर्न इंडस्ट्री सोडली असली तरीही अनेक ब्रँड्स तिला पैसे देण्यासाठी आजही इच्छूक आहेत. त्यामुळेच मियासोबत एक कंपनीने कॅलेंडर (calendar) काढले आणि ती पुन्हा चर्चेत आली. मात्र त्या कॅलेंडरची किंमत प्रचंड असल्यामुळेच आता तिला एका नवा वादाला सामोरे जावे लागले आहे, त्यावरून तिच्यावर प्रचंड टीका केली जात आहे.
ADVERTISEMENT
मियाचे चाहते नाराज
खलिफाने 30, यांनी कंपनीच्या गियरचे प्रदर्शन करण्यासाठी एक फॅन्सी कॅलेंडर तयार करण्यासाठी अगदी उच्च श्रेणीतील फॅशन ब्रँड मेष सोबत काम केले आहे. मात्र टीझरचे फोटो ऑनलाईन पाहिल्यानंतर मियाचे चाहते संतप्त झाले आहेत. लेबनीज-अमेरिकन खलिफा 30 यांच्याकडूननी कंपनीच्या गियरचे प्रदर्शन करण्यासाठी एक फॅन्सी कॅलेंडर तयार केले आहे. त्या टीझरचे फोटो ऑनलाईन पाहिल्यानंतर मात्र मियाचे चाहते संतप्त झाले आहेत.
शॉट्स खूप विचित्र
कॅलेंडरमधील घेतलेले ते शॉट्स खूप विचित्र दाखवण्यात आले आहेत. त्या अनेक शॉटसमध्ये खलिफा ही अगदी तोकड्या कपड्यांमध्ये पोज देताना दिसत आहे. अनेक यूजर्संनी नाराजी व्यक्त केली आहे ती कँलेंडरच्या त्या फोटोशूटसाठी निवडलेले लोकेशनवर. त्या कॅलेंडरमध्ये एक फोटो छापलेला आहे, जो सप्टेंबर 2024 चा आहे. त्या फोटोमध्ये मिया ही ऑफिसच्या एका तुटलेल्या खुर्चीवर बसलेली आहे.
हे ही वाचा >> Shreyas Talpade : घरी आला अन् बेशुद्ध पडला; हार्ट अटॅक आधी श्रेयससोबत काय घडलं?
गांजा आणि धूम्रपान
त्याच कॅलेंडरमधील ऑगस्ट महिन्यासाठी फोटोशूट केलेले फोटो पाहिले तर तेही त्यापेक्षा काही वेगळा नाही. त्यामध्ये तिने रोमन वॉरियर हेडगियर आणि स्कर्ट घातला आहे. फोटोमध्ये मिया तिचा उजवा हात वाकवताना दिसत आहे. तर दुसर्या फोटोत तिने अगदी तिच्या छातीवर गांजाची पानं लावली आहेत आणि ती धूम्रपान करत आहेत.
फोटो जर्गेन टेलरचे
या फोटोशूटबद्दल असंही सांगितलं आहे की, हे सगळे फोटो जर्मन फोटो-आर्ट आणि फॅशन फोटोग्राफर जर्गेन टेलरने शूट केले आहे. जर्गेनला याआधी त्याच्या फोटोसाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. मात्र हे कॅलेंडर चर्चेत आले आहे त्याच्या किंमतींमुळे हे आम्ही आधीच तुम्हाला सांगितले आहे.
कॅलेंडरची किंमत हजारोमध्ये…
कॅलेंडरची फ्रंट बाजू ही ब्राइट गोल्डन कलरमध्ये ठेवण्यात आली आहे. डिलिव्हरी किंमतीशिवाय त्याची किंमत सुमारे 7 हजार 500 रुपये आहे, आणि ते जर ऑनलाइन मागितले तर आणखी हजार रुपये मोजावे लागणार आहेत.या कॅलेंडरचा टीजर आल्यापासून मियाला टीकेला सामोरे जावे लागले आहे. कॅलेंडरच्या किंमतीमुळे अनेक यूजर्संनी सोशल मीडियावरून मियाचा थेट क्लासच घेतला आहे आणि तिला ट्रोलही केले आहे.
कॅलेंडर विकत घेण्यापेक्षा
या कॅलेंडरमुळे मियाला ट्रोल करण्यात आले आहेच, मात्र अनेक यूजर्संनी म्हटले आहे हे कॅलेंडर विकत घेण्यापेक्षा नेटवर तिचे जुने फोटोच बघितलेले बरे. तर काही जण मियाचे दिवस आता संपले आहेत, त्यामुळे तिचे फोटो असलेले कॅलेंडर घेऊन काय विशेष फायदा होणार नाही अशी टीकाही केली आहे.
कॅलेंडर हमासला दे
काही दिवसांपूर्वी मियाने इस्रायल-हमास युद्धावरही आपलं मत व्यक्त केले होते, त्यावेळी तिने पॅलेस्टाईन आणि हमासचे उघडपणे समर्थनही केले होते. त्यावरूनही अनेकांनी सोशल मीडियावरून तिच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता अनेकांनी तिला सल्ला दिला आहे की, तिने हे कॅलेंडर हमासला द्यावे. कारण हमास आणि पॅलेस्टाईनच्याच लोकांना अशा कॅलेंडरची अधिक गरज असल्याचंही बोलले जात आहे.
कॅलेंडरच्या फक्त 300 प्रती
कॅलेंडर आणि फोटोशूटच्या कारणामुळे मिया टीकेला सामोरे जावे लागले असले तरी ज्या कंपनीने हे कॅलेंडर बनवले आहे, त्या कंपनीला मात्र यामुळे काहीच फरक पडणार नाही. त्या कंपनीकडून मिया म्हणजे ज्या प्रकारे एकाद्या केकला जशी चेरी लावलेली असते त्याचप्रकारे कंपनी त्याकडे पाहत आहे. या कॅलेंडरची जोरदार चर्चा झाली असली तरी कॅलेंडरच्या अगदी मर्यादितच प्रती काढले आहेत, त्यामुळे हे मिळणेही तसे अवघड आहे. या कॅलेंडरच्या फक्त 300 प्रती छापण्यात आल्या आहेत, त्यामुळे हे कॅलेंडर काही मोजक्या आणि खास लोकांपर्यंत पोहचणार आहे.
ADVERTISEMENT
